नवी दिल्ली 11 मार्च : चोरीच्या अनेक मोठमोठ्या घटना तुम्ही ऐकल्या असतील. असे अनेक चित्रपट पाहिले असतील ज्यात चोरीचे नियोजन आणि मोठ्या घटना घडताना दाखविण्यात आल्या आहेत. पण खऱ्या आयुष्यातल्या काही घटना ऐकून तुम्ही चक्रावून जाल. नुकतीच अमेरिकेतील एका चोराने अशी घटना घडवली, जी अत्यंत आश्चर्यकारक आहे. तुरुंगात जाण्यासाठी तो इतका उतावळा झाला होता की काही रुपयांसाठी तो चोरी करायला गेला.
होळीसाठी भारतात आलेली जपानी तरुणी; तरुणांनी घेरून केलं धक्कादायक कृत्य, तिघांना अटक..VIDEO
ऑडिटी सेंट्रल न्यूज वेबसाइटच्या वृत्तानुसार, 65 वर्षीय डोनाल्ड सांताक्रोसने अलीकडेच विचित्र दरोडा टाकला आहे, ज्याची खूप चर्चा होत आहे. उटाहमध्ये राहणारा डोनाल्ड सोमवारी सॉल्ट लेक सिटीमधील साउथ मेन स्ट्रीटवरील वेल्स फार्गो बँकेत पोहोचला आणि तिथे बसलेल्या कॅशियरला एक नोट दिली ज्यावर लिहिले होतं - "कृपया मला $1 द्या (82 रुपये).
बँक कर्मचाऱ्याला वाटलं की तो मस्करी करतोय, त्यामुळे त्याने हा मेसेज गांभीर्याने घेतला नाही. यानंतर त्याने या व्यक्तीला $1 दिले आणि निघून जाण्यास सांगितलं. पण डोनाल्डने नुकतंच बँक लुटल्याचं सांगितलं. त्यामुळे कामगारांनी लगेच पोलिसांना बोलावावं, असं तो म्हणाला. या मागणीवर कर्मचारी हसू लागताच तो बँकेच्या लॉबीत बसून पोलिसांची वाट पाहू लागला. त्याने तेथे उपस्थित ग्राहकांना सांगितलं की, त्याच्याकडे बंदूक नाही, यामुळे त्यांनी स्वतःला भाग्यवान समजायला पाहिते. याचे आभार मानले पाहिजेत.
जेव्हा पोलिसांनी येऊन त्याला अटक केली तेव्हा डोनाल्डने सांगितलं की त्याला फेडरल तुरुंगात बंद करावं आणि त्याला सोडू नये, कारण जर तो बाहेर पडला तर तो बँकेत असाच दरोडा टाकेल. त्याने सांगितलं की तो फक्त फेडरल जेलमध्ये जाण्याकरता चोरी करण्यासाठी आला होता, त्यामुळे त्याने जास्त पैशांची मागणी केली नाही. त्या व्यक्तीने त्याचा हेतू काय होता, तो चोरीसाठी का आला हे सांगितलं नाही. अहवालानुसार तो आतापर्यंत तुरुंगातून सुटला आहे, अशा स्थितीत तो भविष्यातही अशा चोरीच्या घटना घडवू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Theft, Viral news