नवी दिल्ली 11 मार्च : दिल्ली शहर आणि 2023 सालची होळी एका जपानी महिलेसाठी भयानक कटु आठवण बनून राहिली. होळी साजरी करण्यासाठी एक 22 वर्षीय जपानी तरुणी दिल्लीमध्ये आली होती. इतक्या तरुणांच्या एका ग्रुपने तिला घेरलं. तिला जबरदस्ती रंग लावला गेला. एका तरुणाने तिच्या डोक्यावर अंडं फोडलं. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहून जाणवतं, की तरुणाला या गोष्टीचा त्रास होत आहे आणि ती असुरक्षित असल्याचं तिला वाटत आहे.
आता याप्रकरणी पोलिसांकडून निवेदन जारी करण्यात आलं आहे. यामध्ये पोलिसांनी म्हटलं आहे की, होळीला एका परदेशी तरुणीला रंग लावण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला. या प्रकरणासंदर्भात एक अपडेट आहे. हा व्हिडिओ पहाडगंज ठाण्याच्या हद्दीतील होळीच्या दिवशीचा आहे. यातील तरुणी एक जपानी पर्यटक आहे, जी दिल्लीच्या पहाडगंजमध्ये राहात होती आणि आता ती बांगलादेशला गेली आहे.
Japanese tourist in india pic.twitter.com/oAShCwdZ4j
— Sweety (@Sweety52216366) March 9, 2023
दिल्ली पोलिसांनी पाठवलेल्या मेलला उत्तर देताना, दूतावासाच्या अधिकाऱ्याने पुष्टी केली की मुलीने दिल्ली पोलिसांकडे किंवा दूतावासात कोणतीही तक्रार/कॉल केलेला नाही. अधिकारी आणि स्थानिक गुप्तचर विभागाच्या अथक प्रयत्नांनंतर व्हिडिओमध्ये दिसणार्या मुलांची ओळख पटली आहे. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलासह तीन तरुणांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली आहे.
व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या घटनेची त्यांनी कबुली दिली आहे. हे सर्व जण जवळच्या पहाडगंज भागातील रहिवासी असून होळीसाठी ते याठिकाणी गेले होते. त्यांच्याविरुद्ध डीपी कायद्यांतर्गत कारवाई सुरू करण्यात आली आहे. मुलीच्या तक्रारीनुसार पुढील कायदेशीर कारवाई निश्चित केली जाईल. मुलीने तिच्या ट्विटर हँडलवरून ट्विट केले आहे की ती बांगलादेशात पोहोचली आहे आणि पूर्णपणे स्थिर आहे. .
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Shocking video viral