जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / रंगपंचमी खेळताना डोळ्यात रंग गेले तर सर्वात आधी ‘हा’ करा उपाय, पाहा Video

रंगपंचमी खेळताना डोळ्यात रंग गेले तर सर्वात आधी ‘हा’ करा उपाय, पाहा Video

रंगपंचमी खेळताना डोळ्यात रंग गेले तर सर्वात आधी ‘हा’ करा उपाय, पाहा Video

Rangpanchmi 2023 : रंगपंचमी खेळते वेळी काय काळाजी घ्यावी आणि रंग जर डोळ्यात गेला तर काय करावे याबाबत डॉक्टरांनी महत्वाचा सल्ला दिला आहे.

  • -MIN READ Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

    साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी कोल्हापूर, 12 मार्च : होळीनंतर भारतात सर्वत्र रंगपंचमीचे वेध लागतात. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी हा रंगोत्सव खेळला जातो. रंगांच्या साहाय्याने नागरिक आनंद लुटतात. मात्र कधी कधी हेच रंग कोणाचे तरी आयुष्यही बेरंगी करू शकतात. त्यामुळे रंगपंचमी खेळताना काळाजी घ्यावी आणि रंग जर डोळ्यात गेला तर काय करावे याबाबत कोल्हापूरच्या डॉक्टरांनी महत्वाचा सल्ला दिला आहे. रंगपंचमी वेळी वापरले जाणारे काही रंग हे शरीराच्या दृष्टीने घातक नसतात. मात्र बहुतांश ठिकाणी घातक, विषारी अशा रासायनिक रंगांची उधळण केली जाते. त्यामुळे आरोग्यावरही घातक परिणाम होतात. यामध्ये रंगांचा सगळ्यात जास्त परिणाम होतो तो म्हणजे त्वचेवर,रासायनिक रंगांचा त्वचेशी संपर्क येऊन ॲलर्जी उठणे, पुरळ येणे, असे परिणाम होऊ शकतात. महत्त्वाचे म्हणजे हे लवकर बरे होत नाहीत. त्यांच्यावर जास्त कालावधीसाठी उपचार करावे लागतात. त्याचबरोबर बऱ्याचदा रंग कानात आतमध्ये जातात. यावेळी कानाच्या पडद्यावर हे रंग चिकटू शकतात. या कानाच्या पडद्याला छिद्र देखील पाडू शकतात. काही केससमध्ये यावर पडद्याचे ऑपरेशन देखील करावे लागते.

    काय आहे नाशिकमधील पेशवेकालीन रहाड रंगोत्सवाची परंपरा? पाहा Video

    शरीराची विशेष काळजी घ्या सगळ्यात घातक म्हणजे डोळ्यात रंग जाणे. डोळ्यात गेलेल्या रंगामुळे डोळे सुजणे, तात्पुरता आंधळेपणा असे विविध त्रास उद्भवू शकतात आणि जर या रंगामध्ये काही तेलकट असे रंग असतील तर कायमचे अंधत्व देखील या कारणामुळे येऊ शकते. तसेच नाकात, तोंडावाटे घशात एखाद्या वेळेस घातक असा रंग गेला. तर शरीरातील अंतर्गत भागात देखील त्रास वाढू शकतात. त्यामुळे रंग खेळताना हे रंग नैसर्गिकच वापरा आणि आपल्या शरीराची विशेष काळजी घ्या, असे सीपीआर सर्वोपचार रुग्णालयातील कान-नाक-घसा विभागप्रमख डॉ. अजित लोकरे यांनी सांगितले. रंग स्वच्छ पाण्याने धुवून टाकला पाहिजे एखाद्या रंगामुळे जर आपल्याला त्रास होऊ लागला असेल, तर सगळ्यात आधी पटकन आपल्या शरीरावर त्रास होणारा भाग स्वच्छ केला पाहिजे. तेथील रंग स्वच्छ पाण्याने धुवून टाकला पाहिजे. आपल्या नेहमीच्या साबणाने ही स्वच्छता करता येते. जर शरीराच्या अंतर्गत भागात रंग गेले असतील, तर ताबडतोब जवळच्या दवाखान्यात जाण्याचा सल्लाही अजित लोकरे यांनी दिला आहे.

    The Royal Horse Show : नाद खुळा! घोड्यांच्या चित्तथरारक कसरतींनी भारावलं कोल्हापूर, Video

    नैसर्गिकच रंग निवडावेत शक्यतो नैसर्गिकच रंग निवडावेत, अशाने जर आपल्या डोळ्यात जरी चुकून रंग गेला, तर तो पटकन धुवून टाकता येईल. जे लोक चष्मा वापरतात किंवा काँटॅक्ट लेन्स वापरतात, त्यांनीही विशेष काळजी घ्यायला हवी. रंग खेळताना काळजी नाही घेतली आणि डोळ्यात रंग गेल्यानंतर ॲलर्जी, डोळे लाल होणे, चरचरणे अशा प्राथमिक समस्या उद्भवू शकतात. यावर सुरुवातील घरातच स्वच्छ पाण्याने साफ करून आणि मग डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपण आपली स्वतःची काळजी घेऊ शकतो, असे सीपीआर सर्वोपचार रुग्णालयातील नेत्रतज्ञ डॉ. अभिजित ढवळे यांनी सांगितले आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात