साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी कोल्हापूर, 11 मार्च : रुबाबदार घोड्यांची चित्तथरारक प्रात्यक्षिके कोल्हापूरकरांना अनुभवता येत आहेत. कोल्हापूरकर ज्याची आतुरतेने वाट बघत होते असा हा तीन दिवसीय रॉयल हॉर्स शो शुक्रवारी सुरू झाला आहे. त्यामुळे कोल्हापूरकर या शोचा आनंद लुटत आहेत. कोल्हापूर इक्वेस्ट्रियन असोसिएशनच्या मार्फत कोल्हापुरात हा हॉर्स शो आयोजित करण्यात आला आहे. किती घोडे सहभागी? 12 मार्च पर्यंत हा शो सुरू असणार आहे. कोल्हापुरातील नवीन राजवाडा अर्थात न्यू पॅलेस परिसरात पोलो मैदानावर हा हॉर्स शोचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे 100 हून अधिक घोडे आणि 250 घाेडेस्वार या हॉर्स शोमध्ये सहभागी असल्याची माहिती कोल्हापूर इक्वेस्ट्रियन असोसिएशनचे अध्यक्ष युवराज मालोजीराजे छत्रपती यांनी दिली आहे.
कोणकोणते घोडे आहेत सहभागी ? या हॉर्स शो मध्ये पुणे, ठाणे, सातारा, अकलूज, कोल्हापूर,पन्हाळा आणि अतिग्रे अशा विविध ठिकाणाहून घोडेस्वार दाखल झाले आहेत. तर 20 थरोब्रेड, 40 काठेवाड, 20 मारवाड़ी असे एकूण 80 गोडे आणि 250 घोडस्वार भाग घेणार आहेत. या शो मध्ये सहभाग घेणाऱ्यांमधे श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटेरी स्कूल, जापलूप्प इक्वेस्ट्रीयन सेंटर, आर्यन’ स वर्ल्ड स्कूल, द ग्रीनफिंगर्ज स्कूल (अकलूज), संजय घोड़ावत इंटरनॅशनल स्कूल, नरकेज् पन्हाळा पब्लिक स्कूल, वरदा राइडिंग क्लब, दक्षिण वैली इक्वेस्ट्रीयन सेंटर आदींनी सहभाग नोंदवला आहे. कशी आहे स्पर्धा ? या स्पर्धेत तीन वयोगट करण्यात आले आहेत. त्यानुसार 14 वर्षांपर्यंतच्या घोडेस्वारांचा, 14 ते 18 वयातील घोडेस्वारांचा ज्युनिअर आणि तिसरा 18 वर्षांपेक्षा जास्त वयाचे घोडेस्वार यांचा ओपन, अशा वयोगटात ही स्पर्धा आहे. त्याचबरोबर जे घोडेस्वार नवीन आहेत, ज्यांनी आजवर कोणतीच स्पर्धा जिंकली नसेल, अशांना प्रोत्साहित करण्यासाठी बिगिनर असा एक वेगळा गट करण्यात आला आहे. तर खास कोल्हापूरच्या घोडेस्वारांसाठी 14 वर्षांखालील आणि 14 वर्षांवरील असे दोन वेगळे गट देखील केलेले आहेत, अशी माहिती घोडेस्वार प्रशिक्षक रोहन मोरे यांनी दिली आहे.
Sangli News : कारपेक्षाही जास्त आहे ‘या’ घोड्याची किंमत, पैलावानाप्रमाणे घेतली जाते खुराकाची काळजी, Videoकोण आहेत परीक्षक ? या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन कोल्हापूर इक्वेस्ट्रियन असोसिएशनचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांनी केले आहे. तर श्री शाहू छत्रपती महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होत आहे. तर अहमदाबाद गुजरात येथील विशाल बिशनोई आणि जर्मनी वरून आलेले ह्रिदय छेड़ा हे या स्पर्धेतील प्रात्यक्षिकांसाठी परिक्षणाचे काम पाहत आहेत. काेल्हापूरातील ही स्पर्धा म्हणजे अश्वप्रेमींसाठी एक पर्वणीच ठरणार आहे असेही युवराज मालोजीराजे छत्रपती यांनी नमूद केले. यामुळे नागरिकांना अत्यंत साहसी प्रात्यक्षिके पाहण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांनी या हॉर्स शो नक्की पाहावा, असेही युवराज मालोजीराजे छत्रपती यांनी सांगितले.