जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ब्राझील, अर्जेंटीना की जर्मनी? कोल्हापूरकरांसाठी कोणती टीम आहे 'लय भारी', पाहा Video

ब्राझील, अर्जेंटीना की जर्मनी? कोल्हापूरकरांसाठी कोणती टीम आहे 'लय भारी', पाहा Video

ब्राझील, अर्जेंटीना की जर्मनी? कोल्हापूरकरांसाठी कोणती टीम आहे 'लय भारी', पाहा Video

FIFA World Cup 2022: कोल्हापूर शहरानं फुटबॉलची परंपरा जपली आहे. इथल्या प्रत्येक पेठांमध्ये एकाहून एक कट्टर असे फुटबॉल फॅन्स आहेत.

  • -MIN READ Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

    कोल्हापूर, 19 नोव्हेंबर : जगभरातील फुटबॉल फॅन्स चार वर्ष ज्याची आतुरतेनं वाट पाहात असतात तो फुटबॉल वर्ल्ड कप रविवारपासून (20 नोव्हेंबर) सुरू होणार आहे. यंदा कतारमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत 32 देशांच्या टीम सहभागी होणार आहेत. भारतीय फुटबॉल टीमचा यामध्ये समावेश नाही. पण, त्यानंतरही भारतामध्ये या वर्ल्ड कपची क्रेझ कायम आहे. बंगाल, केरळ, गोवा या राज्यांमध्ये फुटबॉल हा प्रमुख आवडता खेळ आहे. महाराष्ट्रातल्या कोल्हापूर शहरानं फुटबॉलची परंपरा जपली आहे. इथल्या प्रत्येक पेठांमध्ये एकाहून एक कट्टर असे फुटबॉल फॅन्स आहेत. ते सर्व फॅन्स आपल्या आवडत्या टीमला पाठिंबा देण्यासाठी सज्ज झालेत. ‘आमची टीम यंदा इतिहास घडवेल’ ‘हा वर्ल्ड कप आमचाच’ असा या फॅन्सचा विश्वास आहे. कोणत्या टीमला पाठिंबा? सर्वाधिक वेळा वर्ल्ड कप जिंकणारा ब्राझील, ब्राझीलचा शेजारी अर्जेंटीना, युरोपातील फुटबॉल महासत्ता असलेला जर्मनी, माजी विश्व विजेता स्पेन या सर्व टीमचे समर्थक कोल्हापूरात आहेत. ल्हापुरातल्या पेठा पेठांमधील तालीम मंडळांमध्ये अनेक तरुणांना फुटबॉलचे वेड आहे. यात काही जणांना मेस्सी आवडतो, तर काहीजणांना रोनाल्डो.. याच बाबतीत बऱ्याचदा आपल्या अगदी जवळच्या मित्राबरोबर देखील ते वाद घालतात. कतारमध्ये यावर्षी होणारा फुटबॉल वर्ल्ड कप कोण जिंकणार? यावर शिवाजी पेठेतल्या खंडोबा तालीम परिसरात एकच चर्चा रंगली. ब्राझीलनं यापूर्वी 2002 साली वर्ल्ड कप जिंकला होता. आता 20 वर्षांनी पुन्हा एकदा ही टीम इतिहास घडवेल असा विश्वास त्यांच्या फॅन्सना आहे. ब्राझीलची टीम वीस वर्षांपूर्वी होती तशीच आहे. त्यामुळे ही टीम सहाव्यांदा वर्ल्ड कप जिंकेल, असा विश्वास अजिंक्य जाधव या ब्राझीलच्या फॅननं व्यक्त केला. रांगड्या कोल्हापूरवर चढला फुटबॉलचा फिव्हर, संपूर्ण शहरात वर्ल्ड कपची हवा, Video ब्राझीलचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या अर्जेंटिनाच्या कॅम्पमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. या फॅन्सची सर्व भिस्त महान फुटबॉलपटू आणि अर्जेंटिनाचा कॅप्टन लिओनेल मेस्सीवर आहे. अर्जेंटीनानं यंदा कोपा-अमेरिका स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. आता त्यापाठोठ ही टीम वर्ल्ड चॅम्पियन होईल, असं त्यांचा फॅन योगेश चौगले याला वाटतं. युरोपीयन टीमनाही पाठिंबा फुटबॉल विश्वात दक्षिण अमेरिकन आणि युरोपीयन टीममध्ये मोठी स्पर्धा आहे. दोन्ही खंडातील खेळाडूंची शैली ही वेगळी आहे. त्या शैलीचे फॅन्स सर्वच देशात आहेत. कोल्हापूरातही ब्राझील, अर्जेंटिना या दक्षिण अमेरिकी देशांप्रमाणेच युरोपीयन फुटबॉल टीमचे अनेक फॅन्स आहेत. टी20 चॅम्पियनपेक्षा फिफा वर्ल्ड कपमधली 32वी टीम होणार मालामाल, फिफासमोर ICC म्हणजे… चार वेळा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या जर्मनीनं यंदा उत्तम टीम निवडली आहे. त्यामुळे यंदा ही टीम विश्वविजेती होईल असा विश्वास जर्मनीचा फॅन संकेत सुर्यवंशीनं व्यक्त केलाय. जर्मनीप्रमाणेच स्पेन टीमचं कोल्हापूरकरांना आकर्षण आहे. 2010 साली वर्ल्ड कप जिंकणाऱ्या या टीमनं फुटबॉल विश्वात स्वत:ची अशी खास ओळख तयार केलीय. या टीममध्ये अनेक तरूण खेळाडू आहेत. ते नक्की कमाल करतील, असा दावा स्पेनचा फॅन आशिष बरालेनं केलाय. कोल्हापूर शहरात सध्या फुटबॉलचं वारं वाहत आहे. ब्राझील, अर्जेंटिना, जर्मनी, स्पेन यापैकी कोणती टीम वर्ल्ड कप जिंकणार? या चार टीमच्या बाहेरची टीम यंदा इतिहास घडवणार का? याबाबत प्रत्येक फुटबॉल फॅन्स विश्लेषण करत असून त्याचा अंदाज व्यक्त करत आहे. यापैकी कुणाचं भाकित खरं ठरणार याचं उत्तर 18 डिसेंबर रोजी होणाऱ्या वर्ल्ड कप फायनलनंतरच मिळणार आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात