कोल्हापूर, 14 डिसेंबर : कतारमध्ये सुरू असलेली
फुटबॉल वर्ल्ड कप
स्पर्धा आता अगदी शेवटच्या टप्प्यात आली आहे. संपूर्ण जगभर हा फुटबॉल फिव्हर पसरलेला असताना कोल्हापूरकरांवर तर या खेळाचं गारूड पसरलं आहे. कोल्हापुरातील एका हॉटेल व्यवसायिकाने आपलं फुटबॉल प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि येणाऱ्या ग्राहकांच्या मनोरंजनासाठी हॉटेलमध्येच फुटबॉल स्टेडियमची थीम साकारली आहे. त्यामुळे जेवताना आपण खेळाडूंच्या सानिध्यात बसून जेवतोय, असा फील ग्राहकांना येत आहे. काय आहे थीम? कोल्हापुरातील मिरजकर तिकटी या परिसरात ‘सारथी प्युअर व्हेज’ हे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये नेहमीच ग्राहकांची गर्दी असते. त्यामुळेच येणाऱ्या ग्राहकांना काहीतरी वेगळं वातावरण अनुभवायला मिळावं, या हेतूनं हॉटेलमध्ये फुटबॉल स्टेडियमची थीम साकारली आहे. हॉटेलचे मालक संदीप सूर्यवंशी यांनी आणि त्यांच्या पार्टनर्सना ही संकल्पना सुचली होती. नेमके काय केले आहे ? हॉटेलमध्ये प्रवेश करतानाच दरवाजा बाहेर आपल्याला मेस्सी आणि रोनाल्डो या खेेेळाडूचे कट आउट बघायला मिळतात. आतमध्ये एका बाजूला कोल्हापूरच्या सगळ्या स्थानिक फुटबॉल संघांचे झेंडे लावण्यात आलेले आहेत. हॉटेलमधील टेबल्सच्या बाजूला असणाऱ्या प्रत्येक पिलरवर वेगवेगळ्या दिग्गज खेळाडूंचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.
मेस्सीसोबत वादानंतर रेफ्रीवर कारवाई, फिफाने थेट पाठवलं घरी
हॉटेलच्या मध्यभागी भारतीय फुटबॉल संघाचा कॅप्टन सुनील छेत्री याचा देखील कट आउट लावण्यात आलेला आहे. त्याच्यामागे पाण्याच्या पडद्याआड फिफा वर्ल्ड कपमध्ये सहभागी सर्व संघांच्या कॅप्टन्सचे एक मोठे पोस्टर देखील लावण्यात आलेले आहे. या व्यतिरिक्त हॉटेलमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे. ‘कोल्हापूर हे फुटबॉल वेडे शहर आहे, हे आता सगळ्यांनाच माहीत झालं आहे. त्यासाठीच हॉटेलमध्ये अशी काहीतरी वेगळी थीम करण्याचा विचार होता. त्यामुळे वर्ल्ड कप मधील फुटबॉल मॅचेसच्या वातावरणाप्रमाणे आम्ही ही थीम केलेली आहे. याबद्दल ग्राहक देखील चांगल्या प्रतिक्रिया देत आहेत. आम्ही ठराविक स्टार खेळाडू निवडले आणि त्यांचे पोस्टर्स हॉटेल मध्ये लावलेले आहेत.
फुटबॉलचा 200 वर्ष जुना खजिना नागपुरात! पाहा Video
स्पर्धेतील सर्वच देशांच्या टीमचे झेंडे पताका स्वरुपात लावलेत. वर्ल्ड कपमध्ये सहभागी सर्व टीमच्या कॅप्टन्सचे एक पोस्टर देखील लावले आहे. त्याचबरोबर आम्ही कोल्हापूरच्या फुटबॉल संघांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्नही केलेला आहे, असे संदीप सुर्यवंशी यांनी सांगितले. ‘या हॉटेलमध्ये उत्कृष्ट फुटबॉल थीम साकारली आहे. मैदानात स्टार खेळाडूंच्या सानिध्यात बसून जेवण करत आहोत, असं यामुळे वाटत असल्याचे मत येथील ग्राहक प्रवीण पाटील यांनी व्यक्त केले.
गुगल मॅपवरून साभार
हॉटेलचा पत्ता : पहिला मजला, ईगल प्राईड, मिरजकर तिकटी, कोल्हापूर - 416001 संपर्क (संदीप सुर्यवंशी) : +919423801522

)







