नागपूर, 13 डिसेंबर : जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धेपैकी एक म्हणजे फुटबॉल वर्ल्ड कपची ओळख आहे. जगभर या विश्वचषकाचा उत्सव साजरा केला जात आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी कतार येथे खेळला जाणार आहे. भारतीय संघ जरी फिफा विश्वचषकाची पात्रता फेरी गाठण्यात अपयशी ठरला असला तरी भारतात फुटबॉल चाहत्यांची कमी अजिबात नाही. नागपुरातील अशाच एका फुटबॉल चहात्या क्रीडा प्रेमी तरुणीने फुटबॉल जगतातील एक अनोखा खजिन्याचा संग्रह केला आहे. नागपुरात राहणारी कीर्ती दुबे ही स्वतः एक क्रीडाप्रेमी असून आजवर तीने क्रीडा क्षेत्रात अनेक खेळांच्या माध्यमातून नाव कमावले आहे. याच क्रीडा प्रेमातून किर्तीने तब्बल 76 नामांकित देशांचे फुटबॉल क्लबचे बॅच संग्रही केले आहे. विशेष म्हणजे यातील काही बॅच 200 वर्ष पुरातन असून हे A-Z या क्रमवारीत सजवले आहेत. संग्रहातील खजिना 1976 साली इटली देशाने काढलेले पहिल्या दिवसाचे कव्हर, 2014 साली खेळला गेलेल्या फिफा वर्ल्ड कपच्यावेळी भारत सरकारने प्रसिद्ध केलेले फर्स्ट डे कव्हर, अमेरिका, जापान, इटली, जर्मनी इत्यादी सारख्या देशांनी प्रसिद्ध केलेले फुटबॉलवर आधारित पोस्ट कार्ड देखील संग्रही आहे. यासह मालदीव देशाने काढलेले प्लास्टिक नोट हे विशेष आहे. यावर पारदर्शी फुटबॉलचे चित्र दोन्ही बाजूला दिसेल अशा प्रकारची नोट आहे. लायब्रेरीया या देशाने काढलेला कॉइन संग्रहाचे एक वैशिष्ट्य आहे. यामध्ये ऑक्टोपस प्राणी फुटबॉल घेऊन असल्याचे रंगीन कॉइन संग्रही आहे. Video : गणपती बाप्पासाठी वेचलं आयुष्य, घरी केला हजारांहून जास्त मूर्तींचा संग्रह क्रीडा क्षेत्रात करिअरची आवड मी स्वतः खोखो, अथलेटिक, जिम्नॅस्टिक, नेटबॉल, इत्यादी खेळ खेळत असून मला क्रीडा क्षेत्रात आपले करिअर घडवायचे आहे. बी.कॉम सोबतच बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशनचे शिक्षण घेतले आहे. माझे मामा रूपकिशोर कानोजीया हे स्वतः एक संग्राहक असून त्यांच्या जवळ 200 देशांचे नाणे व 100 देशांच्या नोटा तसेच सर्वात लहान सोन्याचा व सर्वात लहान चांदीचे नाने संग्रही आहे. त्यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनाखाली मी क्रीडा क्षेत्रातला हा संग्रह जमवण्यास सुरुवात केली.
अनेक पुरस्कार आजवर या संग्रहासाठी मला अनेकांनी प्रोत्साहित करून कौतुक केले आहे. तसेच काही पुरस्कार देखील मिळाले आहे. त्यात प्रामुख्याने ऑल इंडिया मेरिट सर्टिफिकेट, प्रोत्साहित पारितोषिक, खेळ रत्न पुरस्कार इत्यादी पारितोषिक मिळाले आहे. या संग्रहातून मी माझ्यासारख्या क्रीडाप्रेमी तरुणांना क्रीडा क्षेत्रात भविष्य घडवण्यासाठी प्रोत्साहित करते. तसेच माणसाने छंद जोपासावा यासाठी इतरांनाही प्रोत्साहित करते, अशी माहिती क्रीडाप्रेमी, संग्रहक कीर्ती दुबेने दिली.