मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Kolhapur Shivaji University : शिवाजी विद्यापीठाच्या कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील परिक्षा स्थगित हे आहे मुख्य कारण

Kolhapur Shivaji University : शिवाजी विद्यापीठाच्या कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील परिक्षा स्थगित हे आहे मुख्य कारण

कोल्हापूर सांगली आणि सातारा या जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे शिवाजी विद्यापीठाच्या (Kolhapur Shivaji University) दिनांक 10 व 11 ऑगस्ट 2022 रोजीच्या आयोजित करण्यात आलेल्या परीक्षा स्थगित

कोल्हापूर सांगली आणि सातारा या जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे शिवाजी विद्यापीठाच्या (Kolhapur Shivaji University) दिनांक 10 व 11 ऑगस्ट 2022 रोजीच्या आयोजित करण्यात आलेल्या परीक्षा स्थगित

कोल्हापूर सांगली आणि सातारा या जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे शिवाजी विद्यापीठाच्या (Kolhapur Shivaji University) दिनांक 10 व 11 ऑगस्ट 2022 रोजीच्या आयोजित करण्यात आलेल्या परीक्षा स्थगित

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kolhapur, India

कोल्हापूर, 10 ऑगस्ट : मागच्या दोन दिवसांपासून कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील अनेक भागातील रस्ते बंद झाले आहेत. यामुळे कोल्हापूर सांगली आणि सातारा या जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे शिवाजी विद्यापीठाच्या (Kolhapur Shivaji University) दिनांक 10 व 11 ऑगस्ट 2022 रोजीच्या आयोजित करण्यात आलेल्या परीक्षा स्थगित करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आल्या आहेत. या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येत असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.

शिवाजी विद्यापीठाअंतर्गत होणाऱ्या परिक्षा स्थगित होणार असल्याची माहिती संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्याकडून माहिती देण्यात आली आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागात ओढे नाले नद्यांना पूर आल्याने गावांचा शहरापासूनचा संपर्क तुटला आहे. याची खबरदारी घेत विद्यापीठ प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा : राज्यात पुढचे 48 तास महत्वाचे 9 जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट, तर मुंबई, पुण्याला येलो अलर्ट

कोल्हापूर जिल्ह्यात पूर परिस्थिती

कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने कोल्हापूर जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. दरम्यान आज सकाळी आज (दि.10) सकाळी 5.30 वाजता राधानगरी धरणाचे स्वयंचलित द्वार क्रमांक 6 उघडले. (Kolhapur Rain Update)या दरवाज्यातून 1428 क्युसेक्स विसर्ग व पाॅवर हाऊसमधूनचा 1600 असा एकूण 3028 क्यूसेक्स विसर्ग सुरु आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी दिली. दरम्यान राधानगरी धरणाचा एक दरवाजा उघडल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसाने पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ सुरूच असून पंचगंगेने काल रात्री 10 वाजता इशारा पातळी गाठली. पावसाचा जोर कमी झाला असला तरी धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने धरणांच्या पाणी पातळीतही वाढ सुरूच आहे. राधानगरी धरण काठोकाठ भरल्याने धरणाचा 6 वा स्वयंचलित दरवाजा उघडला आहे. चित्री आणि कडवी ही आणखी दोन धरणे मंगळवारी भरल्याने पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. पंचगंगा यावर्षी प्रथमच इशारा पातळीवर गेली. यामुळे जिल्ह्याला महापुराचा धोका कायम आहे.

हे ही वाचा : कसला हा योगायोग 24 वर्षीय मुलगा आणि 42 वर्षीय आई दोघेही एकाचवेळी स्पर्धा परिक्षेत उत्तीर्ण

मंगळवारी सकाळी आठपर्यंत गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 57.8 मि.मी. पाऊस झाला. कोल्हापूर शहरात अतिवृष्टी झाली. 24 तासांत शहरात 84 मि.मी. पाऊस झाला. यासह गगनबावडा (100.2), पन्हाळा (88.6), शाहूवाडी (86), राधानगरी ( 79.8) व चंदगड (69.2 मि.मी.) या पाच तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली. हातकणंगले 42, शिरोळ 28.8, करवीरमध्ये 59.3, कागल 49.3, गडहिंग्लज 22, भुदरगड 53.5 तर आजऱ्यात 51.6 मि.मी. पाऊस झाला.

First published:

Tags: Exam Fever 2022, Kolhapur, Rain in kolhapur, Sangli (City/Town/Village), Satara (City/Town/Village)