जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / हसन मुश्रीफांच्या भोवती ईडीने फास आवळला, पुन्हा एकदा छापेमारी

हसन मुश्रीफांच्या भोवती ईडीने फास आवळला, पुन्हा एकदा छापेमारी

हसन मुश्रीफ

हसन मुश्रीफ

पुन्हा एकदा हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापे टाकले आहेत. यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त पाहायला मिळाला.

  • -MIN READ Kolhapur,Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून हसन मुश्रीफ ईडीच्या रडारवर आहेत. दिवसेंदिवस त्यांचे पाय आणखी खोलात जात आहेत. त्यांच्या अडचणी देखील वाढत आहेत. पुन्हा एकदा हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापे टाकले आहेत. यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त पाहायला मिळाला. मुश्रीफ यांच्या कागल इथल्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. यावेळी ईडीकडून चौकशी सुरू आहे. याआधी देखील मुश्रीफ यांच्या घरावर आणि बँकेत छापेमारी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. कुठे-कुठे कारवाई? ११ जानेवारी रोजी मुश्रीफ यांच्या मालमत्तेवर ईडीने कारवाईचा बडगा उचलला. कोल्हापूर आणि पुण्यातील मालमत्तांवर इडीने बुधवारी पहाटे एकाचवेळी कारवाई करीत छापे टाकले. यापूर्वी अशाच प्रकारची कारवाई करून कागदपत्र जप्त करण्यात आली होती. पुण्यातील कोरेगाव पार्क आणि बंडगार्डन येथील मालमत्तांवर सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी पहाटे छापे टाकून पुन्हा काही कागदपत्रे जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Kolhapur News : फिट कोल्हापूरसाठी प्रशासन राबवणार नवा उपक्रम, तुम्हीही होऊ शकता सहभागी

नेमकं काय प्रकरण? हसन मुश्रीफ यांची मुले सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात संचालक आणि भागधारक आहेत. या कारखान्याकडे मोठ्या प्रमाणात पैसे आले आणि या ते कुठून आणि कसे आले याबाबत कोणतीही समाधानकारक माहिती ईडीला मिळालेली नाही. हे पैसे अवैध मार्गाने आल्याचं ईडीने म्हटलं आहे.

कोल्हापुरात एकाच बैलगाडा शर्यतीत तीनदा अपघात, अंगावर काटा आणणारा VIDEO

ईडीकडून हसन मुश्रीफ यांना टार्गेट करण्याचा मुख्य हेतू असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्याविरोधात कोणतेही गैरव्यवहार केल्याचे समोर आले नसल्याचे सांगितले. ईडीने हे आरोप फेटाळून लावताना न्यायालयात दिशाभूल केली जात असल्याचे सांगितले. छापेमारी कायदेशीर मार्गाने झाल्याने ईडीने सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात