साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी कोल्हापूर, 8 मार्च : 2023 हे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. यानिमित्त अनेक ठिकाणी विविध उपक्रम राबवले जात आहेत कोल्हापुरा तही असाच एक उपक्रम जिल्हा प्रशासनाच्या वतीने तृणधान्याच्या प्रसारासाठी आयोजित करण्यात आला आहे. मिलिट बॉक्स आणि बाईक रॅली असा हा उपक्रम आहे. राज्यातील तृणधान्यांच्या वापराला आणि उत्पादन क्षेत्र वाढीला प्रोत्साहन मिळावे, त्याचबरोबर त्या उत्पादनांना योग्य हमीभाव मिळावा यासाठी राज्य शासन प्रयत्न करत आहे. त्यामुळेच महाराष्ट्र मिलेट मिशन राबवले जात आहे. त्याच अनुषंगाने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023च्या निमित्याने मिलेट वॉक बाईक रॅलीचे आयोजन कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय आणि कृषी विभाग यांच्याकडून संयुक्तरीत्या करण्यात आले आहे.
कोल्हापूरचे ‘लय भारी’ फोटो काढा आणि मिळवा भरपूर बक्षीस! ‘या’ पद्धतीनं व्हा सहभागी
कधी राबवला जाणार हा उपक्रम ? कोल्हापूर शहरात मिलेट वॉक हा दसरा चौक पासून लक्ष्मीपुरी-बिंदू चौक-छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे पुन्हा दसरा चौक येथे येऊन संपन्न होईल. तर सायबर कॉलेज पासून आईचा पुतळा-राजारामपुरी मुख्य रस्ता-बागल चौक-पार्वती टॉकीज-शाहूपुरी मेन रोड-गोकुळ हॉटेल-हिनस कॉर्नर-फोर्ड कॉर्नर-अयोध्या टॉकीज मार्गे दसरा चौक असा बाईक रॅलीचा मार्ग असणार आहे. दिनांक 9 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजता या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येणाऱ्या प्रत्येकाने स्वतःचे एक ओळखपत्र सोबत ठेवावे. त्याचबरोबर सर्व वयोगटातील इच्छुकांना मोफत प्रवेश असल्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या उप्रकामात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मुलाला वाचवण्यासाठी आई देणार किडनी, पण ऑपरेशनमध्ये ‘हा’ मोठा अडथळा!
दरम्यान या मिलिटरी आणि बाईक रॅलीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये तृणधान्यांविषयी जनजागृती होईल. या तृणधान्यांची पौष्टिकता लक्षात घेऊन त्यांचे आहारातील प्रमाण वाढण्यास नक्कीच मदत होईल असा विश्वास देखील व्यक्त केला जात आहे.