मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'तुम्ही चुकीच्या पद्धतीने सेक्स करता', डॉक्टराने रेकॉर्ड केल्या महिला रुग्णांच्या 80 क्लिप, कोल्हापुरात खळबळ

'तुम्ही चुकीच्या पद्धतीने सेक्स करता', डॉक्टराने रेकॉर्ड केल्या महिला रुग्णांच्या 80 क्लिप, कोल्हापुरात खळबळ

डॉक्टरने बनवले महिलांचे अश्लील व्हिडीओ

डॉक्टरने बनवले महिलांचे अश्लील व्हिडीओ

कोल्हापुरातील मुरगूडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका बोगस डॉक्टरने आपल्या रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या महिलांच्या अश्लील व्हिडीओ क्लिप तयार केल्या आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kolhapur, India

कोल्हापूर, 26 फेब्रुवारी, ज्ञानेश्वर साळुंखे : कोल्हापुरातील मुरगूडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका बोगस डॉक्टरने आपल्या रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या महिलेंसोबत अश्लील चाळे करत त्याच्या व्हिडीओ क्लिप तयार केल्याचं उघड झालं आहे. या डॉक्टरच्या सत्तर ते ऐंशी क्लिप व्हायरल झाल्यानं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात मुरगूडमधील सुमारे चारशे लोकांना निनावी पत्रं आली. या पत्रामधून हा प्रकार समोर आला आहे. या डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

उपचारासाठी आलेल्या महिलांच्या व्हिडीओ क्लिप

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, या क्लिप बोगस डॉक्टरने स्वत:च तयार केल्या आहेत. या महिला डॉक्टरकडे उपचारालासाठी आल्यानंतर तो या महिलांसोबत अश्लील चाळे करून त्याच्या व्हिडीओ क्लिप बनवायचा.

(घरी परताच मुलीची 'ती' अवस्था पाहून आई, वडिलांनी फोडला हंबरडा, घटनेनं पंढरपुरात खळबळ)

विशेष म्हणजे या डॉक्टरने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या व्यवसायाची जोरदार जाहिरात देखील केली होती, त्यामुळे परराज्यातून लोक त्याच्याकडे उपचारासाठी यायचे. याच संधिचा फायदा या बोगस डॉक्टरने घेतला. त्याने ज्या पीडितांच्या अश्लील चित्रफीत बनवल्या आहेत, त्यामध्ये मुलींचा देखील समावेश आहे. कंबर दुखणाऱ्या महिलांना तुम्ही चुकीच्या पद्धतीनं सेक्स करता म्हणून कंबर दुखते असं हा डॉक्टर सांगत होता.

पोलिसांनाही पाठवलं पत्र

दरम्यान त्याने या सर्व अश्लील चित्रफीत एका लॅपटॉपमध्ये स्टेअर करून ठेवल्या होत्या. हा लॅपटॉप दुरुस्तीसाठी गेल्यानंतर या चित्रफीत व्हायरल झाल्याची माहिती समोर येत आहे.

(पोपट ओरडला अन् खुनाचा उलगडा झाला; पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या)

या प्रकरणात आता मुरगूडमधील सुमारे चारशे लोकांना निनावी पत्रं आली आहे. कोल्हापूर पोलीस मुख्यालयाला देखील अशाच प्रकारचं एक निनावी पत्र तसेच पेनड्राईव्ह पाठवण्यता आला आहे. मात्र अद्यापर्यंत कोणाचीच तक्रार आली नसल्यानं गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचं पोलिसांनी सांगितलं.

First published:
top videos

    Tags: Crime, Crime news, Kolhapur