मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /घरी परताच मुलीची 'ती' अवस्था पाहून आई, वडिलांनी फोडला हंबरडा, घटनेनं पंढरपुरात खळबळ

घरी परताच मुलीची 'ती' अवस्था पाहून आई, वडिलांनी फोडला हंबरडा, घटनेनं पंढरपुरात खळबळ

प्रतिकात्मक छायाचित्र

प्रतिकात्मक छायाचित्र

पंढरपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pandharpur, India

सोलापूर, 26 मार्च, वीरेंद्रसिंह उत्पात : पंढरपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात अभ्यास करणाऱ्या मुलीने अचानक घराच्या लोखंडी अँगला गळफास घेऊन आपलं जीवन संपवल्यानं शहरात खळबळ उडाली आहे. रुपाली नामदेव बंकवाड असं या मुलीचं नाव आहे. रुपालीने अचानक टोकाचं पाऊल का उचललं? याबाबत अद्याप केणतंही कारण समोर आलेलं नाहीये. रुपालीच्या असं अचानक जाण्यानं तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. घटनेचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोपट ओरडला अन् खुनाचा उलगडा झाला; पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या

  हलाकीची परिस्थिती 

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, रुपाली बंकवाड या मुलीच्या घरची परिस्थिती हलाकीची होती. आई, वडील मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदर्निवाह करत होते. नेहमीप्रमाणे आई, वडील कामासाठी बाहेर गेले होते. तर रुपाली घरी अभ्यास करत बसली होती. मात्र जेव्हा ते घरी परतले तेव्हा त्यांना धक्काच बसला. घराच्या दुसऱ्या मजल्यावरील लोखंडी अँगला त्यांना रुपाली गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये दिसून आली. तीला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषीत केलं.

गळफासाचं कारण अस्पष्ट  

रुपाली बंकवाड ही मुलगी अत्यतं गरीब कुटुंबातील होती. आई,वडील बाहेर कामासाठी गेले असता तिने घरातच गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. रुपालीने आत्महत्या का केली याबात अद्याप कोणतही कारण समोर आलेलं नाहीये. घटनेचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसां दिली.

First published:
top videos

    Tags: Crime, Crime news, Pandharpur, Solapur