अग्ना, 26 मार्च : अग्र्यातील एका वृत्तपत्राचे मुख्य संपादक विजय शर्मा यांच्या घरी 20 फेब्रुवारी 2014 मध्ये दरोडा पडला होता. दरोड्यानंतर शर्मा यांच्या पत्नी नीलम शर्मा यांची हत्या झाली. मात्र शर्मा यांनी आपल्या घरात एक पोपट पाळाला होता. या पोपटाच्या ओरडण्यामुळे पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. पोपट घेत असलेल्या एकाच नावामुळे विजय शर्मा यांना संशय आला, आणि यातूनच पुढे हत्येचा उलगाडा झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर त्याने हत्येची कबुली दिली. घटनेच्या तब्बल नऊ वर्षांनंतर आरोपीला जन्मठेप सुनावण्यात आली आहे.
पोपटाच्या ओरडण्यावरून संशय
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पोपटाच्या ओरडण्यावरून शर्मा यांनी आपल्या भाच्याची चौकशी करण्याची विनंती पोलिसांना केली होती. पोलीस चौकशीमध्ये त्यांचा भाचा आशू याने आपला मित्र रॉनीच्या मदतीनं नीलम यांची हत्या केल्याची कबुली दिली. या प्रकरणात शुक्रावारी विशेष न्यायाधीश मोहम्मद रशीद यांनी आशू आणि त्याचा मित्र रॉनी याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
'असा' झाला हत्येचा उलगडा
मिळत असलेल्या माहितीनुसार ज्या दिवशी निलम यांची हत्या झाली, त्या दिवशी विजय शर्मा यांचा मुलगा राजेश आणि मुलगी निवेदिता हे फिरोजाबाद येथे एका लग्नासाठी गेले होते. घरी निलम एकट्याच होत्या. मात्र ज्यावेळी ते घरी परतले तेव्हा समोरचं दृष्य पाहुन त्यांना धक्काच बसला. निलम या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या त्यांच्यावर चाकून अनेक वार करण्यात आले होते. मात्र हा सर्व घटनाक्रम शर्मा यांनी पाळलेल्या पोपटाने पाहिला होता. तो घाबरला होता. त्याने खाणे,पिणेही सोडले होते. मात्र तो सारखा शर्मा यांच्या भाच्याचं नाव घ्यायचा यातूनच या हत्येचा उलगडा झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Crime news, Murder, Parrot, Police