जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Kolhapur News : कोल्हापूरच्या घटनेवर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Kolhapur News : कोल्हापूरच्या घटनेवर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

(देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया)

(देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया)

‘अचानक औरंग्याच्या एवढ्या अवलादी कुठून पैदा झाल्या याचा शोध घ्यावा लागेल, जाणून बुजून कायदा आणि सुव्यवस्था खराब झाली पाहिजे’

  • -MIN READ Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

नागपूर, 07 जून : ‘अचानक औरंग्याच्या एवढ्या अवलादी कुठून पैदा झाल्या याचा शोध घ्यावा लागेल, जाणून बुजून कायदा आणि सुव्यवस्था खराब झाली पाहिजे, हे कोण करीत आहे तपासून बघावा लागेल, कोल्हापूरमध्ये आता परिस्थिती नियंत्रणाखाली आहे, पूर्णपणे पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. सगळ्यांना विनंती आहे कोणीही कायदा आणि सुव्यवस्था या ठिकाणी खराब होणार नाही याची सगळ्यांनी काळजी घ्यावी’ अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरच्या प्रकरणावर दिली. आक्षेपार्ह पोस्टवरून कोल्हापुरात हिंदुत्ववाद्यांनी आंदोलनाची हाक दिली होती. पोस्टविरोधात आक्रमक झालेल्या आंदोलकांनी छत्रपती शिवाजी चौकात ठिय्या मांडला. तर त्याचवेळी आंदोलकांकडून दगडफेक आणि रिक्षाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली. कोल्हापुरातील तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ‘अचानक औरंग्याच्या एवढ्या अवलादी कुठून पैदा झाल्या याचा शोध घ्यावा लागेल, जाणून बुजून कायदा आणि सुव्यवस्था खराब झाली पाहिजे, हे कोण करीत आहे तपासून बघावा लागेल, कोल्हापूरमध्ये आता परिस्थिती नियंत्रणाखाली आहे, पूर्णपणे पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. कायदा कोणी हातात घेऊ नये कुठलाही परिस्थितीत औरंग्याच्या अवलादीला सोडणार नाही, असा कडक इशारा फडणवीस यांनी दिला. (Kolhapur News : कोल्हापुरात आंदोलक आक्रमक, रिक्षाची तोडफोड आणि दगडफेक; VIDEO VIRAL) ‘या ठिकाणी कधीही औरंगजेबाचा उदात्त्यकरण होऊ शकणार नाही. हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे पण हे जे नव्हे कोण आहेत हे शोधून काढावे लागेल आणि आम्ही ते शोधून काढू, मात्र महाराष्ट्र कायदा हातात घेतल्यामुळे एकीकडे या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोच पण त्यासोबत महाराष्ट्राचा जो नावलौकिक आहे. त्याच्यावरही त्याच्यामुळे कुठेतरी डाग लागतो, म्हणून सगळ्यांना विनंती आहे कोणीही कायदा हातात घेऊ नये, कोणीही कायदा हातात घेतला तर त्याच्यावर कारवाई करावीच लागेल, असंही फडणवीस म्हणाले. दरम्यान, शरद पवार काय म्हणाले हे मला माहिती नाही. पण महाराष्ट्रात औरंगजेबाचा उदात्तीकरण होणार तर संताप निर्माण होतोच, फक्त अशा प्रकारच्या संतापामध्ये कायदा हातात घेणे योग्य नाही’ असंही फडणवीस म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात