जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Kolhapur News : कोल्हापुरात आंदोलक आक्रमक, रिक्षाची तोडफोड आणि दगडफेक; VIDEO VIRAL

Kolhapur News : कोल्हापुरात आंदोलक आक्रमक, रिक्षाची तोडफोड आणि दगडफेक; VIDEO VIRAL

कोल्हापुरात आंदोलक आक्रमक, पोलिसांकडून लाठीचार्ज

कोल्हापुरात आंदोलक आक्रमक, पोलिसांकडून लाठीचार्ज

कोल्हापुरमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीवर गृहखात्याने पोलिसांना आदेश दिले असून चुकीचं वागणाऱ्यांवर कारवाई करण्यास सांगितले आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

कोल्हापूर, 07 जून : आक्षेपार्ह पोस्टवरून कोल्हापुरात हिंदुत्ववाद्यांनी आंदोलनाची हाक दिली होती. पोस्टविरोधात आक्रमक झालेल्या आंदोलकांनी छत्रपती शिवाजी चौकात ठिय्या मांडला. तर त्याचवेळी आंदोलकांकडून दगडफेक आणि रिक्षाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली. याचे व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्जही केला. कोल्हापुरातील तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत. औरंगजेबची भलावण करणाऱ्यांना महाराष्ट्रात माफी नाहीच. पोलिस सुद्धा कारवाई करतच आहेत. त्याचवेळी जनतेने सुद्धा शांतता पाळावी, कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही, ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहविभागाला दिलेल्या आहेत. Kolhapur News : आक्षेपार्ह पोस्ट विरोधात शिवाजी चौकात गर्दी, आंदोलकांवर लाठीचार्ज कोल्हापुरमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीवर गृहखात्याने पोलिसांना आदेश दिले असून चुकीचं वागणाऱ्यांवर कारवाई करण्यास सांगितले आहे. तसंच कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी असंही आवाहन करण्यात आलं आहे. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्याला महाराष्ट्रात माफी नाही. जनतेने शांतता पाळावी असं आवाहन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

जाहिरात

शहरातील परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे आदेश देवेंद्र फ़डणवीस यांनी दिले आहेत. राष्ट्रपुरुषांचा अवमान करणाऱ्या आक्षेपार्ह पोस्टमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आक्षेपार्ह पोस्टनंतर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यासमोर आंदोलनही केले. दरम्यान, कारवाईचे ठोस आश्वासन न मिळाल्याने संतप्त जमावाकडून दगडफेक करण्यात आली. कोल्हापुरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी लाठीमारही केला. तसंच जिल्ह्यात 19 जूनपर्यंत बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. त्यानुसार पाच किंवा त्याहून जास्त लोकांना एकत्र जमा होण्यास बंदी असणार आहे. याशिवाय जमाव जमवणे, मिरवणुका काढणे, सभा, प्रतिमांचे प्रदर्शन, आवेशपूर्ण भाषणे करण्यासही मनाई असणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: kolhapur
  • First Published :
जाहिरात
जाहिरात