मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /लोकप्रतिनिधी झाला म्हणजे शिंगे फुटली का? अजितदादांनी गोपीचंद पडळकरांना फटकारलं

लोकप्रतिनिधी झाला म्हणजे शिंगे फुटली का? अजितदादांनी गोपीचंद पडळकरांना फटकारलं


महाराष्ट्रात विचित्र राजकारण सुरू आहे. हे महाराष्ट्राला परवडणारे नाही. महापुरुषांबाबत वारंवार अपशब्द बोलले जातात.

महाराष्ट्रात विचित्र राजकारण सुरू आहे. हे महाराष्ट्राला परवडणारे नाही. महापुरुषांबाबत वारंवार अपशब्द बोलले जातात.

महाराष्ट्रात विचित्र राजकारण सुरू आहे. हे महाराष्ट्राला परवडणारे नाही. महापुरुषांबाबत वारंवार अपशब्द बोलले जातात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kolhapur, India

कोल्हापूर, 08 जानेवारी : 'गोपीचंद पडळकर याच्या भावाने सांगलीमध्ये काय केले याची माहिती मी घेणार आहे. पदावर असलो म्हणून नातेवाईकांनीही नीट वागले पाहिजे. हे सध्याच्या काळात होत नाही. लोकप्रतिनिधी झाला म्हणजे शिंगे फुटली असे होत नाही, असं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली.

अजित पवार हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना अजितदादांनी भाजपवर जोरदार टीका केली.

महाराष्ट्रात विचित्र राजकारण सुरू आहे. हे महाराष्ट्राला परवडणारे नाही. महापुरुषांबाबत वारंवार अपशब्द बोलले जातात. मुद्दामहून ठरवून करता का? शिवाजी महाराजांबबत वाईट शब्द वापरले तर दिलगिरीही व्यक्त करत नाहीत. माणूस आहे माणूस चुकतो पण हे थांबायला तयार नाहीत. महात्मा फुले त्यावेळी श्रीमंत होते त्यांनी पैसा समाज्याला दिला. त्याला तुम्ही भीक म्हणता. अजित पवार कुणाला घाबरणारा माणूस नाही, असं म्हणत अजितदादांनी चंद्रकांतदादा पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

(मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे गटाचा वाद चव्हाट्यावर, संजय राऊतांचा शब्द खरा ठरला!)

राज्यातील एक जरी उद्योग बाहेर गेला तर प्रचंड नुकसान होतं. त्यामुळे कोणत्याही नेत्यांनी दोन-चार उद्योग बाहेर गेले म्हणून काय झाले असे वक्तव्य करू नये, असं म्हणत अजितदादांनी राज ठाकरेंच्या वक्तव्यावर टीका केली.

सिमाप्रश्नासाठी अनेकांनी जीवाची पर्वा केली नाही. 865 गावे महाराष्ट्रात अली पाहिजेत. सुप्रीम कोर्टाची केस हरिश साळवी यांच्याकडे द्यावी. आम्हाला एक इंच सुद्धा जागा न देणारे कोण? सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर इंच आणि इंच जागा घेतल्या शिवाय गप्प बसणार नाही. आम्ही सीमाप्रश्नी ठराव करणे भाग पाडले. कर्नाटकात जाण्यास कोणाला बंदी आणायचा अधिकार नाही. कर्नाटक मुंबई मागतेय ह्यांच्या बाबांनी मुंबई ठेवली आहे. ही त्यांच्या काकांची आहे का? असा सवालही अजितदादांनी उपस्थितीत केला.

(औरंगजेबजी म्हणालो पण...,चंद्रशेखर बावनकुळेंनी पत्रक काढून दिलं स्पष्टीकरण)

'सध्या राज्यात वेगळे वातावरण सुरू आहे. धार्मिक तेढ निर्माण होईल असे वातावरण आहे. शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांची गरज आहे. स्थानिक स्वराज संस्थेच्या फेब्रुवारी 2022 ला निवडणुका घ्यायच्या होत्या. दुर्दैवाने ओबीसींची संधी काढून घेतली. याविरोधात न्यायालयात सुद्धा गेलो. मात्र तोपर्यंत सत्तांतर घडले. आज सहा महिने झालेत पाहिले काही महिने दोघेच काम करत राहिले. 43 लोक मंत्रिमंडळात घेता येतात. लोकांचे काम गतीने होते. आम्ही म्हटल्यावर मंत्रिमंडळ वाढवले. महिलांना मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व नाही. चांगल्या महिला विधिमंडळात आहेत. आम्ही महिलांना संधी दिली होती तुम्ही संधीच देत नाही तर महिला काम कशा करणार. महिलांना मंत्रिमंडळात स्थान देत नाहीत महिलांनी कोणाची बटणे दाबायचे हे ठरवले पाहिजे, असंही अजितदादा म्हणाले.

First published:

Tags: Ajit pawar