शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन निवृत्त होणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यांच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा करताच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेत्यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले.
कार्यकर्ते आणि नेते खूप भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. समिती योग्य तो निर्णय घेईल, कार्यकर्त्यांच्याच मनातला निर्णय घेऊ असं म्हणत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं.
यावेळी सभागृहात कार्यकर्ते भावुक झाले होते. छगन भुजबळ, जयंत पाटील यांच्या डोळ्यात अश्रू होते तर बोलताना शब्द जड झाले होते.
देशातल्या जनतेसाठी ते पक्षाच्या प्रमुखपदी असणं आवश्यक आहे, अचानक बाजूला जाण्याचा हक्क नाही म्हणत, जयंत पाटलांना कोसळलं रडू. त्यांनी अशाप्रकारचा निर्णय घेणं आम्हाला मान्य नाही तुम्ही हा निर्णय मागे घ्या अशी कळकळीची विनंती केली.
तुमच्यासोबत सुख-दु:खात राहिला आहात, कमिटी आम्हाला मंजूर नाही तुम्ही आमच्यासोबत राहा अशी विनंती छगन भुजबळ यांनी केली आहे.
शरद पवारांनी कुठेही जाऊ नये असं आम्हाला वाटतं, त्यांनी आमच्यासोबत असावं अशी मागणी यावेळी नेत्यांनी केली.