जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Kishori Pednekar : अडीच तास पोलीस चौकशीनंतर किशोरी पेडणेकर संतापल्या, म्हणाल्या...

Kishori Pednekar : अडीच तास पोलीस चौकशीनंतर किशोरी पेडणेकर संतापल्या, म्हणाल्या...

Kishori Pednekar : अडीच तास पोलीस चौकशीनंतर किशोरी पेडणेकर संतापल्या, म्हणाल्या...

भाजपचे माजी खासदार यांनी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प घोटाळ्याप्रकरणी आरोप केले होते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 01 नोव्हेंबर : भाजपचे माजी खासदार यांनी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प घोटाळ्याप्रकरणी आरोप केले होते. या आरोपावरून पोलिसांकडून अडीच तास चौकशी करण्यात आली. दादर पोलिस ठाण्यात आज (दि.01) दुसऱ्यांदा त्यांची चौकशी करण्यात आली. दरम्यान त्या चौकशी नंतर बाहेर आल्यावर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली तसेच त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत.

जाहिरात

झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात सदनिका देण्याच्या नावाखाली रक्कम घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात किशोरी पेडणेकर यांनी घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. तसेच त्यांच्या चौकशीची मागणीही केली होती. त्यानुसार पेडणेकर यांना पोलिसांनी समन्स बजावल होते. या चौकशीसाठी पेडणेकर दादर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. तेथे त्यांची सुमारे अडीच तास चौकशी करण्यात आली.

जाहिरात

हे ही वाचा :  पुन्हा तारीख! महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर पुढील सुनावणी 29 नोव्हेंबरला

चौकशीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आरोप एका पक्षाच्या वरीष्ठ नेत्याने केला आहे. प्रत्येक आरोपाला उत्तर दिले पाहीजे असे नाही. पोलिसांनी जे प्रश्न विचारले त्याची मला माहीत असलेली उत्तरे दिली आहेत. मी कायद्याची लढाई लढत आहे. आरोपामध्ये 10 टक्केही सत्य नाही. साप समजून दोरी बडवण्याचा प्रकार सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

जाहिरात

प्रत्येक आरोपाला उत्तर दिले पाहिजे असे नाही. कर नाही त्याला डर कशाला अशी म्हण आहे त्याप्रमाणे मी आले, आम्ही बराच वेळ बसलो होतो त्यात बराच वेळ गप्पांमध्ये वेळ गेला. जे रंगवल जात आहे त्यातील 10 टक्केही खरे नाही. मला कोणी मेसेज केला मी तो वाचला का? ज्याने मेसेज केला त्याला उत्तर देण्यास बांधिल मी बांधील नसल्याचे ही त्या म्हणाल्या.

जाहिरात

हे ही वाचा :  मी राजीनामा देतो फक्त…, अब्दुल सत्तार यांचं मोठ विधान, आदित्य ठाकरेंनाही ओपन चॅलेंज

मी मुख्यमंत्र्यांना निरोप दिला आहे त्यांची वेळ घेतली आहे त्यांना निवेदन देणार आहे. त्यांच्यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार आहे. मी मुळ शिवसैनिक म्हणून त्यांची भेट घेणार असल्याचे त्या म्हणाल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात