मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

किरीट सोमय्यांचा मोठा खुलासा, हसन मुश्रीफांचा 100 कोटींचा दुसरा घोटाळा उघड

किरीट सोमय्यांचा मोठा खुलासा, हसन मुश्रीफांचा 100 कोटींचा दुसरा घोटाळा उघड

 भाजप नेते (BJP Leader) किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांची नुकतीच पत्रकार परिषद पार पडली.

भाजप नेते (BJP Leader) किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांची नुकतीच पत्रकार परिषद पार पडली.

भाजप नेते (BJP Leader) किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांची नुकतीच पत्रकार परिषद पार पडली.

  • Published by:  Pooja Vichare
सातारा, 20 सप्टेंबर: भाजप नेते (BJP Leader) किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांची नुकतीच पत्रकार परिषद पार पडली. या परिषदेत सोमय्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Musrif) यांचा दुसरा घोटाळा (Scam) उघडकीस आणला आहे. गडहिंग्लजच्या आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात मुश्रीफ यांनी 100 कोटींचा घोटाळा केला आहे, असा गंभीर आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्याशी मुश्रीफ यांचा काय संबंध आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. यासंबंधीचे पुरावे उद्या ईडी आणि इनकम टॅक्स विभागाकडे देणार असल्याची माहिती देत या घोटाळ्याची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. मी मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळाही लवकरच उघडकीस आणणार असल्याचा दावाही सोमय्या यावेळी केला आहे. Breaking News: मला 6 तास कोंडून ठेवलं, किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषद  ब्रिक्स इंडियाचे बेनामी मालक आहेत. मतीन इंगोली हे मुश्रीफ यांचे जावई आहे. मतिन हे या कंपनीचे मालक आहेत. यातील 98 टक्के शेअर्स हे कोलकात्याचे आहेत. यात 2 टक्के हे हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबियांचे आहेत. कोणताही साखर कारखाना चालवण्याचा अनुभव नसलेल्या कंपनीकडे जबाबदारी दिली, असंही सोमय्यांनी म्हटलं आहे. 2020 मध्ये कारखाना ब्रिक्स इंडियाकडे चालवण्यासाठी देण्यात आला. तेव्हा सहकार मंत्रालयाने हा कारखाना दिला अशी माहिती सोमय्यांनी दिली. चरणजीत सिंह चन्नी आज घेणार CM पदाची शपथ; कॅप्टन यांच्या उपस्थितीबाबत सस्पेन्स  हसन मुश्रीफ यांच्यामुळे मला अंबे मातेचं दर्शन घेता आलं नसल्याचं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे. तक्रार करणाऱ्यालाच अटक केली असल्याचा आरोप सोमय्यांनी यावेळी परिषदेत केला आहे. तक्रारदाराला रोखण्याचा इतिहास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच करू शकतात, असंही ते म्हणालेत. महिला तलाठ्याकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या प्रांताधिकाऱ्याच्या अडचणीत वाढ; प्रशासनाकडून मोठं पाऊल   मला सहा तास कोंडून ठेवलं. वकिलांनी नोटीस दिल्यानंतर मग मला विसर्जन करायला जाऊ दिलं. मला सीएसटी स्टेशनला अडवून ठेवलं.मला गाडी मिळणार नाही अशी व्यवस्था केली. पोलिसांनी खोटी बनवलेली ऑर्डर वाचून दाखवली अजी चॅलेंज केली तर पळून गेले, असं त्यांनी सांगितलं.
First published:

Tags: BJP, Kirit Somaiya, NCP

पुढील बातम्या