जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नाशिक / महिला तलाठ्याकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या प्रांताधिकाऱ्याच्या अडचणीत वाढ; प्रशासनाकडून मोठं पाऊल

महिला तलाठ्याकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या प्रांताधिकाऱ्याच्या अडचणीत वाढ; प्रशासनाकडून मोठं पाऊल

Shocking! रुग्णालयाच्या बाथरूममध्ये तरुणीवर बलात्कार, घटनेने खळबळ

Shocking! रुग्णालयाच्या बाथरूममध्ये तरुणीवर बलात्कार, घटनेने खळबळ

Crime in Nashik: काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील येवला येथील एका महिला तलाठ्याकडे (Woman talathi sexual molestation) प्रांताधिकाऱ्याने शरीरसुखाची मागणी (senior officer demand sexual relation) केल्याची घटना उघडकीस आली होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

नाशिक, 20 सप्टेंबर: काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील येवला येथील एका महिला तलाठ्याकडे (Woman talathi sexual molestation) प्रांताधिकाऱ्याने शरीरसुखाची मागणी (senior officer demand sexual relation) केल्याची घटना उघडकीस आली होती. पीडित महिलेनं मॅटकडे तक्रार दाखल केल्यानंतर महसूल विभागात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी विशाखा समितीकडून जिल्हा प्रशासनाला चौकशी अहवाल सादर केला आहे. त्यानंतर आता जिल्हा प्रशासनाने संबंधित प्रांताधिकाऱ्याला नोटीस बजावली (district administration issued notice) असून संबंधित घटनेबाबत खुलासा मागवला आहे. सोपान कासार असं आरोप झालेल्या प्रांताधिकाऱ्याचं नाव आहे. महिला तलाठ्याच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात विनयभंग, दमदाटी करण्याच्या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. बदलीस पात्र नसतानाही संशयित आरोपीने ज्येष्ठतेचे नियम डावलून नांदगाव तालुक्यात पीडित महिला तलाठ्याची बदली केली होती. या प्रकरणी पीडित महिला तलाठ्यानं मॅटकडे धाव घेतली होती. त्यानंतर 23 ऑगस्टपर्यंत मॅटने बदलीस स्थगिती दिली होती. हेही वाचा- प्रेमासाठी तरुणीचं धक्कादायक पाऊल; पळून जाण्याआधी पूर्ण कुटुंबाला दिलं विष दरम्यान, पीडितेनं येवला पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी मांढरे यांनी विशाखा समितीकडून याबाबत अहवाल मागवला होता. अलीकडेच विशाखा समितीनं जिल्हा प्रशासनाकडे अहवाल सादर केला आहे. त्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यानं संबंधित प्रांताधिकाऱ्याला नोटीस बजावून खुलासा मागवला आहे. त्यामुळे आरोपी प्रांताधिकाऱ्याच्या अडचणींत वाढ झाली आहे. हेही वाचा- घरात भाऊ नसल्याचं पाहून साधला डाव; दीराने वहिनीची केलेली अवस्था पाहून हादराल! जिल्हा प्रशासनाने येवला प्रांताधिकारी सोपान कासार यांच्यावर कारवाई का करू नये? अशी विचारणा जिल्ह्याधिकाऱ्यांनी संबंधित नोटीशीत केली आहे. विशेष म्हणजे विशाखा समितीने सादर केलेल्या अहवालात देखील कासार यांच्यावर विनयभंगाचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे कासार यांच्या अडचणींत वाढ झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात