मराठी बातम्या /बातम्या /देश /चरणजीत सिंह चन्नी आज घेणार CM पदाची शपथ; कॅप्टन यांच्या उपस्थितीबाबत सस्पेन्स

चरणजीत सिंह चन्नी आज घेणार CM पदाची शपथ; कॅप्टन यांच्या उपस्थितीबाबत सस्पेन्स

चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) आज सकाळी 11 वाजता पंजाबचे नवीन मुख्यमंत्री (Panjab New CM) म्हणून शपथ घेणार (oath ceremony) आहेत. चन्नी यांच्यासोबत दोन उपमुख्यमंत्रीही शपथ घेऊ शकतात अशी चर्चा आहे.

चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) आज सकाळी 11 वाजता पंजाबचे नवीन मुख्यमंत्री (Panjab New CM) म्हणून शपथ घेणार (oath ceremony) आहेत. चन्नी यांच्यासोबत दोन उपमुख्यमंत्रीही शपथ घेऊ शकतात अशी चर्चा आहे.

चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) आज सकाळी 11 वाजता पंजाबचे नवीन मुख्यमंत्री (Panjab New CM) म्हणून शपथ घेणार (oath ceremony) आहेत. चन्नी यांच्यासोबत दोन उपमुख्यमंत्रीही शपथ घेऊ शकतात अशी चर्चा आहे.

चंदीगड, 20 सप्टेंबर: चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) आज सकाळी 11 वाजता पंजाबचे नवीन मुख्यमंत्री (Panjab New CM) म्हणून शपथ घेणार (oath ceremony) आहेत. चन्नी यांच्यासोबत दोन उपमुख्यमंत्रीही शपथ घेऊ शकतात अशी चर्चा आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा देण्यात आला नाही. असं म्हटलं जात आहे की, शपथ घेतल्यानंतर चन्नी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्याशी बातचित करणार आहेत. त्यानंतरच ते मंत्रिमंडळाचा निर्णय घेणार आहेत. चन्नी यांच्या शपथविधीबद्दल माहिती देताना पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत (Harish rawat) म्हणाले की, राज्याला दोन उपमुख्यमंत्री हवे आहेत.

सध्या पंजाबमध्ये चन्नी यांच्या शपथविधी सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. या शपथविधी कार्यक्रमाला राहुल गांधी, नवज्योतसिंग सिद्धू, माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यासह अनेक नेत्यांना शपथविधीसाठी आमंत्रण देण्यात आलं आहे. पण माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह चन्नी यांच्या शपथविधीला उपस्थित राहतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत म्हणाले की, “नवीन मुख्यमंत्र्यांचं नाव कालच निश्चित करण्यात आलं होतं.

हेही वाचा-सामान्य रुग्ण बनून गेलेल्या आरोग्य मंत्र्यांना गार्डनं दिला दंडुका, काय घडलं?

चरणजितसिंग चन्नी यांच्या नावाला पक्षाने आधीच एकमत जाहीर केलं होतं. कॅप्टन अमरिंदर सिंग हेही मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी उपस्थित राहावेत, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पण त्यांना यायचं की नाही हे त्यांनी ठरवायचं आहे. आम्ही आत्ताच त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. आम्ही उद्या सकाळीही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू,' अशी माहितीही हरीश रावत यांनी काल दिली होती. त्यामुळे आज सकाळी अकरा वाजता अमरिंदर सिंग शपथविधी कार्यक्रमाला हजर राहणार का ? याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आली नाही.

हेही वाचा-BREAKING : भाजपच्या माजी मंत्र्याने घरात गळफास घेऊन केली आत्महत्या

खरंतर, कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी अलीकडेच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान त्यांनी आपला अपमान झाल्याचा आरोपही केला होता. त्यानंतर, पार पडलेल्या काँग्रेस पक्षाच्या बैठकीत एक ठराव मंजूर करण्यात आला, ज्यामध्ये नवीन मुख्यमंत्र्याबाबत निर्णय घेण्यात आला. पंजाबचं एकंदरीत राजकारण लक्षात घेत, पक्षाच्या हायकमांडने नवीन मुख्यमंत्री म्हणून चन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला.

First published:
top videos

    Tags: Panjab