जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Breaking News: मला 6 तास कोंडून ठेवलं, किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषद LIVE

Breaking News: मला 6 तास कोंडून ठेवलं, किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषद LIVE

Breaking News: मला 6 तास कोंडून ठेवलं, किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषद LIVE

भाजप नेते किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत हसन मुश्रीफांचा दुसरा घोटाळा उघड केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

सातारा, 20 सप्टेंबर:  भाजप नेते किरीट सोमय्यांनी आताच पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. हसन मुश्रीफ यांच्यामुळे मला अंबे मातेचं दर्शन घेता आलं नसल्याचं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे.  तक्रार करणाऱ्यालाच अटक केली असल्याचा आरोप सोमय्यांनी यावेळी परिषदेत केला आहे. तक्रारदाराला रोखण्याचा इतिहास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच करू शकतात, असंही ते म्हणालेत. मला सहा तास कोंडून ठेवलं. वकिलांनी नोटीस दिल्यानंतर मग मला विसर्जन करायला जाऊ दिलं. मला सीएसटी स्टेशनला अडवून ठेवलं.मला गाडी मिळणार नाही अशी व्यवस्था केली. पोलिसांनी खोटी बनवलेली ऑर्डर वाचून दाखवली अजी चॅलेंज केली तर पळून गेले, असं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री तुम्ही भगवा सोडून हिरवा धारण करा. पण आम्हाला आमच्या सण साजरे करू द्या. गैरकायदेशीर डांबून ठेवणाऱ्या पोलिसांवर कारवाई व्हावी, अशी मागणी यावेळी किरीट सोमय्यांनी केली आहे. उद्धव ठाकरेंचा उद्धटपणा सहन करणार नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. LIVE: हसन मुश्रीफांचा 11 वाजता पत्रकार परिषद, सोमय्यांच्या आरोपांना देणार उत्तर गनिमी काव्यानं हल्ला होऊ शकतो हे ऑर्डर मध्ये लिहिलंय मग हे इतर एजन्सीला का कळवलं नाही. माझ्यावर हल्ला कोण करणार हसन मुश्रीफ की त्यांचे गुंड ?, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. पोलिसांच्या विरोधात आम्ही हायकोर्टात जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. माझ्यावर हल्ला व्हावा ही सरकारची इच्छा आहे का? असा सवालही त्यांनी विचारला आहे. त्या भीतीने माझ्यावर हल्ला करणार आहे का? ही शरद पवार यांची रणनीती आहे का ?, असा सवाल सोमय्यांनी उपस्थित केला. मी केलेल्या तक्रारीवर चौकशी सुरू झाली असून ईडीने अतिरिक्त माहिती माझ्याकडे मागवली असल्याची माहिती किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. चरणजीत सिंह चन्नी आज घेणार CM पदाची शपथ; कॅप्टन यांच्या उपस्थितीबाबत सस्पेन्स   माझ्यावर या पूर्वी दोन वेळा शिवसेनेकडून हल्ला झाला आहे. माझ्या 170 कोटीच्या प्रश्नांचं उत्तर का देत नाही, असंही ते म्हणालेत. मी हात जोडून विनंती केली की ऑर्डर दाखवा. पुराव्यासह मी कागल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार होतो पण मला अडवलं गेलं. सीएसएमटी स्टेशनवर मला पोलिसांनी धक्काबुक्की देखील करण्यात आली.  मुंबईबाहेर जाण्यापासून रोखण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश मला पोलिसांनी दाखवले, असंही सोमय्या म्हणाले. किरीट सोमय्यांना सकाळी घेतलं होतं ताब्यात किरीट सोमय्या BJP leader kirit somaiya)  यांना पहाटे 4.30 च्या सुमारास पोलिसांनी कराडमध्ये ताब्यात घेतलं होतं. कोल्हापूर आणि सातारा पोलिसांनी (Kolhapur and Satara Police)ही संयुक्तरित्या कारवाई केली होती.  ताब्यात घेतल्यानंतर ठाकरे सरकार इतकं घाबरलं आहे की मला कोल्हापूरला जाण्यास बंदी घातली अशी प्रतिक्रिया सोमय्यांनी दिली. तसंच कोल्हापुराला जाऊन मला आंबेमातेचे दर्शन करायचं आहे. आज मी कराडमध्ये उतरत आहे. पण पुढच्या दोन दिवसांत मी कोल्हापुराला जाणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात