जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Karad Janata Bank : संजय राऊत झाले आता शरद पवार आणि अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर ईडीच्या धाडी, कराड जनता बँकेच्या संचालकांची चौकशी

Karad Janata Bank : संजय राऊत झाले आता शरद पवार आणि अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर ईडीच्या धाडी, कराड जनता बँकेच्या संचालकांची चौकशी

Karad Janata Bank : संजय राऊत झाले आता शरद पवार आणि अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर ईडीच्या धाडी, कराड जनता बँकेच्या संचालकांची चौकशी

जरंडेश्वर साखर कारखान्यालाही यातून बेकायदा कर्ज दिल्याची माहिती समोर आली आहे. (Karad Janata Bank)

  • -MIN READ Karad,Satara,Maharashtra
  • Last Updated :

सातारा, 03 ऑगस्ट : कराड जनता बँकेत बेकायदा  कर्ज वाटप केल्या प्रकरणी आज सकाळी ईडीकडून धाड टाकण्यात आली आहे. बँकेत शेकडो कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी कराडमधील राजेंद्र पाटील यांनी ही तक्रार केली होती. दरम्यान कराड जनता बँकेत राष्ट्रवादीची सत्ता आहे या संचालकांमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांचे संचालक जास्त असल्याने या कारवाईची जोरदार चर्चा होत आहे. दरम्यान जरंडेश्वर साखर कारखान्यालाही यातून बेकायदा कर्ज दिल्याची माहिती समोर आली आहे. (Karad Janata Bank)

जाहिरात

कराड तालुक्यात कराड जनता बँक नावारुपास आहे. दरम्यान या बँके गैरव्यवहार होत असल्याची ईडीकडे कराडमधील राजेंद्र पाटील यांनी केली होती या तक्रारीची दखल घेत अचानक ईडीकडून कराडमध्ये बँकेच्या संचालकांकडे चौकशीसाठी अधिकारी दाखल झाले यामुळे कराड तालुक्यात एकच खळबळ उडाली. दरम्यान या बँकेच्या संचालक मंडळात सगळीच मंडळी ही शरद पवार आणि अजित पवार यांच्या निकटवर्तीयातील असल्याने ही कारवाई महत्वाची मानली जात आहे.

हे ही वाचा :  ‘एकाच्या हातात दगड, दुसऱ्याच्या हाती सळई, समोरुन मला शिवीगाळ’, उदय सामंतांनी सांगितला हल्ल्याचा थरार

दरम्यान मागच्या कित्येक वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या जरंडेश्वर साखर कारखान्यालाही या बँकेतून बेकायदा कर्ज दिल्याची माहिती राजेंद्र पाटील यांनी ईडीकडे दिली आहे. या तक्रारीवरून बँकेतील संबंधितांकडे कसून चौकशी सुरू आहे. अस्तित्वात नसलेल्या लोकांच्या नावे कर्ज वाटप केल्याचीही यामध्ये तक्रार करण्यात आली आहे. बँकेच्या संचालकांकडे याबाबत चौकशी सुरू आहे या चौकशीतून नेमकं काय बाहेर येतं हे पाहण महत्वाचे आहे.  

जाहिरात

बँकेच्या मुख्य कार्यालयात ईडीच्या अधिकारी दिवसभर ठाण मांडून होते. बँकेच्या कर्ज व्यवहारांची चौकशी केली. तीन दिवसापूर्वी अवसायानिक मनोहर माळी यांच्याकडेही ईडीने कर्ज वसुलीच्या सध्यस्थितीचा अहवाल मागवला आहे. ईडी कार्यालयात तत्पूर्वी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राजेश पाटील-वाठारकर व मुख्य कार्यकारी अधिकारी विलास सुर्यवंशी यांच्याकडेही तब्बल दहा तासाहून अधिक काळ चौकशी झाली आहे.

हे ही वाचा :  जळगावात राजकारण तापलं, एकनाथ खडसेंच्या पत्नीसह 11 जणांविरोधात पोलिसांत तक्रार

जाहिरात

कराड जनता बँकेच्या कर्ज व्यवहरांची ईडीतर्फे चौकशी सुरू आहे. त्यानुसार अवसायानिक म्हणून माझ्याकडून त्या कर्ज कशी वितरीत केली, यासह त्या व्यवहारांची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यानुसार त्यांनी व्यापक अहवाल मागविला आहे. तो लवकरच ईडीला देण्यात येणार आहे. असे बँकेकडून सांगण्यात आले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात