जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / जळगावात राजकारण तापलं, एकनाथ खडसेंच्या पत्नीसह 11 जणांविरोधात पोलिसांत तक्रार

जळगावात राजकारण तापलं, एकनाथ खडसेंच्या पत्नीसह 11 जणांविरोधात पोलिसांत तक्रार

जळगाव जिल्हा दूध संघात प्रशासक मंडळ आणि संचालक मंडळ आमनेसामने

जळगाव जिल्हा दूध संघात प्रशासक मंडळ आणि संचालक मंडळ आमनेसामने

जळगाव जिल्हा दूध संघात प्रशासक मंडळ आणि संचालक मंडळ आमनेसामने

  • -MIN READ
  • Last Updated :

नितीन नांदूरकर, प्रतिनिधी जळगाव, 03 ऑगस्ट : जळगाव जिल्हा दूध संघाचं राजकारण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आमदार एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसेंसह इतर 11 जणांविरुद्ध प्रशासक मंडळाची पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. बरखास्त संचालक मंडळाने दूध संघात अनधिकृतपणे बैठक घेतल्याने प्रशासक मंडळाने आक्षेप घेतला आहे. जळगाव जिल्हा दूध संघात प्रशासक मंडळ आणि संचालक मंडळ आमनेसामने आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पहायला मिळाले. दिवसभराचा दोघांमधील हा वाद आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. मंदाताई खडसे यांच्यासह त्यांच्या संचालक मंडळाविरोधात सदस्य अरविंद देशमुख यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. संचालक मंडळाविरोधात कारवाईची मागणी तक्रारीत केली आहे. ( वजन कमी करायचंय? आंघोळीच्या पाण्यात घाला सैंधव मीठ, होतात आश्चर्यकारक फायदे ) संचालक मंडळ बरखास्त असतांनाही मंदाताई खडसे यांच्यासह त्यांच्या संचालक मंडळातील ११ संचालकांनी अनधिकृतरित्या जिल्हा दूध संघाच्या आवारात बेकायदेशीररित्या प्रवेश करुन दूधसंघाच्या मिटींग हॉलमध्ये बैठक घेतल्याचे अरविंद देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. ( गणेश यंत्राचे हे 5 ज्योतिषी उपाय करून बघा; सुख-समृद्धीने होईल कुटुंबाची भरभराट ) यापुढे संचालक मंडळाने बेकायदेशीररित्या प्रवेश केल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होवून गुन्हा घडल्याची शक्यता अरविंद देशमुख यांनी तक्रारीव्दारे व्यक्त केली आहे. संबंधितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी असेही तक्रारीत म्हटले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात