मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /कोरोनाचा कहर! कंटेन्मेंट झोनमध्ये आता 'कडक लॉकडाऊन', प्रशासनाचा निर्णय

कोरोनाचा कहर! कंटेन्मेंट झोनमध्ये आता 'कडक लॉकडाऊन', प्रशासनाचा निर्णय

आरोग्य विषयक समस्या आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळून इतर कोणी कंटेन्मेंट झोनमधून बाहेर पडल्यास गुन्हे दाखल केले जातील.

आरोग्य विषयक समस्या आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळून इतर कोणी कंटेन्मेंट झोनमधून बाहेर पडल्यास गुन्हे दाखल केले जातील.

आरोग्य विषयक समस्या आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळून इतर कोणी कंटेन्मेंट झोनमधून बाहेर पडल्यास गुन्हे दाखल केले जातील.

  कल्याण, 27 जून: कल्याण-डोंबिवली महापालिका (केडीएमसी) क्षेत्रात 12 जून ते 25 जून या कालावधीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3177 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत एकूण 96 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कंटेन्मेंट झोनमध्ये आता कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे.

  हेही वाचा..कोरोनावर इंजेक्शन निघालं, पण ते आपल्याला परवडणारं नाही; शरद पवारांचा मोठा खुलासा

  केडीएमसीमधील कटेन्मेंट झोनमधील सर्व ठिकाणे सील करणार असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले आहे. पुढील 10 दिवसांत किंवा 15 जुलैपर्यत कोरोनाबाधित रुग्ण संख्या 20 हजारांवर पोहोचण्याची शक्यता आहे, अशा भीती आयुक्तांनी वर्तवली आहे. तर लॉकडाऊन कडक करण्यासाठी एसआरपीएफची (SRPF)मदत घेण्यासाठी आम्ही विचारधीन आहोत, असे कल्याण डीसीपी विवेक पानसरे यांनी सांगितले.

  आयुक्तांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कंटेन्मेंट झोनमध्ये कडक लॉकडाऊन केला आहे. शनिवारी पालिका आयुक्त आणि कल्याण डीसीपी यांनी लॉकडाऊन केलेल्या कंटेनमेंट झोनची पाहणी केली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, या झोनमधील नागरिकांना निर्बंध असतील. आरोग्य विषयक समस्या आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळून इतर कोणी कंटेन्मेंट झोनमधून बाहेर पडल्यास गुन्हे दाखल केले जातील. संसर्ग रोखण्यासाठी सील आणखी झोन सील केले जातील.

  सध्या केडीएमसीमध्ये रुग्णसंख्या दुपटीचा वेग 10 दिवसांवर आला असून वाढता प्रादुर्भाव पाहता पुढील 10 दिवसांत किंवा 15 जुलै पर्यत रुग्णसंख्या 20 हजारांवर पोचलेली असेल. मात्र, यात घाबरण्यासारखे कारण नाही. कारण यातील 70 ते 75 टक्के रुग्ण हे लक्षण विरहीत असल्यामुळे सहज करोनावर मात करू शकतील. रुग्णांवर तातडीने उपचार करता यावेत यासाठी प्रशासनाने 6 ते 7 हजार खाटांची व्यवस्था केली आहे. प्रत्येक वॉर्डात 200 ते 300 खाटांची व्यवस्था करण्यासाठी जागांचा शोध सुरू केला असून त्या प्रभागातील रुग्णांना या ठिकाणी विलगीकरणात ठेवता येईल.

  हेही वाचा... नवरदेवाच्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू, हळदीला आलेल्या 90 पाहुण्यांची चाचणी

  सध्या पालिकेने 250 खाटांची आयसीयू आणि 1000 खाटांची व्यवस्था महापालिका पुढील काळात करणार तर 20 खासगी रुग्णालये कोविड रुग्णालये म्हणून कार्यरत असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे.

  First published:

  Tags: Corona, Corona virus, Coronavirus, Coronavirus disease, Kalyan, KDMC