नवी दिल्ली, 06 एप्रिल : सोनम कपूर तिच्या सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. मात्र तिने नुकत्याच केलेल्या ट्वीटमुळे ती ट्विटरवर टॉप ट्रेंडिगमध्ये आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 मिनिटं दिवे लावण्याचं आवाहन केलं होतं. मात्र काही जणांनी दिवे लावण्याऐवजी फटाके फोडले आणि आतषबाजी केली. सध्या सोनम कपूर तिच्या सासरी म्हणजे दिल्लीमध्ये आहे. या फटांक्यामुळे काही दिवसांपासून शांत असलेल्या दिल्लीवर वाईट परिणाम झाला आणि याचा सर्वाधिका त्रास कुत्र्यांना झाला असल्याचं ट्वीट सोनम कपूरने केले आहे. या तिच्या ट्वीटनंतर लोकांनी अनिल कपूरचे फटाके लावतानाचे फोटो आणि व्हि़डीओ पोस्ट करत सोनमला ट्रोल केले आहे. (हे वाचा- सहाव्या नेगिटिव्ह टेस्टनंतर कनिका कपूरला डिस्चार्ज, डॉक्टरांनी केली ‘ही’ सूचना ) सोनमने दोन ट्वीट केले आहेत. यामध्ये तिने फटाके फोडणाऱ्यांना मूर्ख म्हटलं आहे. काही दिवसांपासून शांत असणाऱ्या दिल्लीतील कुत्र्यांना, पक्ष्यांना या मुर्खांमुळे त्रास झाल्याची टीका सोनम कपूरने केली आहे.
People are bursting crackers. Just FYI . They dogs are freaking out. Do people think it’s Diwali? I’m so confused.
— Sonam K Ahuja (@sonamakapoor) April 5, 2020
सोनमला ट्रोल करताना अनेकांनी तिला तिच्या लग्नात लावलेल्या फटाक्यांची आठवण करून दिली आहे. काहींनी अनिल कपूरचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. ज्यामध्ये तो फटाक्याची मोठी माळ लावताना दिसत आहे.
अभिनेत्री पायल रोहतगीने सुद्धा सोनमवर टीका केली आहे. अनेकांनी मीम्स बनवत सोनमला ट्रोल केले आहे.
ट्वीटर युजर्सनी अनिल कपूरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो फटाके लावत आहे आणि सोनम दूरूनच हे सर्व पाहत आहे. यावेळी सोनमला कुत्र्यांबद्दल काही वाटले नाही का असा सवाल ट्विटर युजर्सनी केला आहे. दरम्यान नेहमीच ट्रोलर्सना स्पष्ट उत्तर देणाऱ्या सोनमने यावेळीही असच ट्वीट केले आहे. तिने या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, ‘मुर्खांशी कधी वाद घालू नये. ते तुम्हाला खाली खेचून त्यांच्या स्तरावर आणतील आणि या अनुभवाने तुम्हाला हरवतील.’ मार्क ट्विनचे हे शब्द तिने ट्वीट केले आहेत.
Never argue with stupid people, they will drag you down to their level and then beat you with experience.
— Sonam K Ahuja (@sonamakapoor) April 6, 2020
Mark Twain
सोनमच्या या ट्वीटनंतर सुद्धा अनेकांनी तिला ट्रोल केले आहे. दरम्यान सोनमच्या या ट्वीटनंतर मार्क ट्विन सुद्धा ट्विटरवर ट्रेंडिग आहे. काही दिवसांपूर्वी गायिका कनिका कपूरच्या बाजुने बोलल्यानंतर सोनम कपूर ट्रोल झाली होती.