जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra politics : अजित पवारांनी व्यक्त केलेली भीती खरी ठरणार? महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट

Maharashtra politics : अजित पवारांनी व्यक्त केलेली भीती खरी ठरणार? महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट

विरोधी पक्षनेते अजित पवार

विरोधी पक्षनेते अजित पवार

के. चंद्रशेखर राव हे आपलं अख्ख मंत्रिमंडळ घेऊन पंढरपुरात येणार आहेत. ते 27 जून रोजी विठ्ठलाचं दर्शन घेणार आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 23 जून : राज्यात सर्व पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. जागा वाटपाबाबत युती आणि महाविकास आघाडीमध्ये बैठका सुरू आहेत. घटक पक्षांकडून आपल्या वाट्याला येणाऱ्या संभाव्य जागांचा आढावा देखील घेण्यात येत आहे. यावेळची लोकसभा निवडणूक तसेच विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मोठी चूरस निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती बीआरएसनं महाराष्ट्रात एन्ट्री केली आहे. दरम्यान अजित पवार यांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांचे कान टोचताना बीआरएसला हलक्यात घेऊ नका असं म्हटलं आहे. यावरूच विरोधक देखील बीआरएसबाबत सावध भूमिका घेत असल्याचं दिसून येत आहे. प्रचाराला सुरुवात के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात आगामी निवडणुका डोळ्यासमोर जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यांच्या नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा देखील झाल्या आहेत. इतर पक्षातील अनेक नेते सध्या बीआरएसमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. एवढंच नाही तर त्यांनी भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये देखील धडक मारली आहे. काही दिवसांपूर्वीच के. चंद्रशेखर राव यांच्या हस्ते नागपुरात बीआरएसच्या पहिल्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं आहे. यावेळी त्यांनी कार्यकर्ता मेळावा देखील घेतला आहे. राष्ट्रवादीच्या पोस्टरवर शिंदे, फडणवीसांचा फोटो; काँग्रेस, ठाकरे गटाला वगळलं, मुश्रीफ पुन्हा चर्चेत! विठ्ठलाचं दर्शन घेणार त्यानंतर आता के. चंद्रशेखर राव हे आपलं अख्ख मंत्रिमंडळ घेऊन पंढरपुरात येणार आहेत. ते 27 जून रोजी पंढरपुरात येऊन आपल्या मंत्र्यांसह विठ्ठलाचं दर्शन घेणार आहेत. तसेच ते विठ्ठलाच्या दर्शनानंतर तुळजाभवानीचं देखील दर्शन घेणार आहेत. त्यामुळे आता के. चद्रशेखर राव यांना महाराष्ट्र स्विकारणार का हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: ajit pawar , NCP
  • First Published :
जाहिरात
जाहिरात