जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Political News : राष्ट्रवादीच्या पोस्टरवर शिंदे, फडणवीसांचा फोटो; काँग्रेस, ठाकरे गटाला वगळलं, मुश्रीफ पुन्हा चर्चेत!

Political News : राष्ट्रवादीच्या पोस्टरवर शिंदे, फडणवीसांचा फोटो; काँग्रेस, ठाकरे गटाला वगळलं, मुश्रीफ पुन्हा चर्चेत!

हसन मुश्रीफांचं ते पोस्टर चर्चेत

हसन मुश्रीफांचं ते पोस्टर चर्चेत

राष्ट्रवादीच्या पोस्टरवर शिंदे, फडणवीसांचे फोटो छापण्यात आले आहेत, मात्र दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस नेत्यांचे फोटो छापण्यात न आल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.

  • -MIN READ Kolhapur,Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

कोल्हापूर, 23 जून, ज्ञानेश्वर साळोखे : कोल्हापूरमधून मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र शासन आणि हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने गडहिंग्लजमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं आहे. 28 जून  रोजी हा कार्यक्रम होणार आहे. मात्र सध्या या कार्यक्रमाची जोरदार चर्चा सुरू आहे. या कार्यक्रमासाठी छापण्यात आलेल्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो छापण्यात आले आहेत, मात्र दुसरीकडे काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांचे फोटो छापण्यात आलेले नाहीत. काँग्रेस, शिवसेनेच्या नेत्यांचा विसर? राष्ट्रवादी वगळता महाविकास आघाडीमधील एकाही नेत्याचा फोटो या कार्यक्रम पत्रिकेत छापण्यात न आल्यानं काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांचा विसर पडला का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. या पत्रिकेमध्ये  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे फोटो छापण्यात आले आहेत. मात्र दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांचे फोटो या पत्रिकेत छापण्यात आलेले नाहीयेत.

News18

Political News : हरिभाऊ बागडे पु्न्हा मैदानात; अधिकाऱ्यांना फुटला घाम, काहींचा वाढला बीपी; नेमकं काय घडलं? कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे नागरिकांना आव्हान  येत्या 28 जूनला हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ‘गडहिंग्ज शहर व गिजवणे कडगाव जिल्हापरिषद मतदार संघात शासन आपल्या दारी या अभियाना अंतर्गत सर्व नागरिकांना व विद्यार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. तरी या सर्व योजनांचा नागरिकांनी लाभा घ्यावा. मा. हसन मुश्रीफ फाऊडेशन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, गडहिंग्लज शहर व गिजवणे कडगाव जिल्हापरिषद मतदारसंघ’ असा मजकूर या पोस्टरवर छापण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात