मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

कोरोना व्हायरसवर विकसित केली लस, इस्रायलमधील शास्त्रज्ञांना मिळालं मोठं यश

कोरोना व्हायरसवर विकसित केली लस, इस्रायलमधील शास्त्रज्ञांना मिळालं मोठं यश

चीनमधून संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसने घेतलेल्या बळींचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्ण संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे.

चीनमधून संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसने घेतलेल्या बळींचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्ण संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे.

चीनमधून संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसने घेतलेल्या बळींचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्ण संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे.

  • Published by:  Sandip Parolekar

जेरुसलेम,12 मार्च: चीनमधून संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसने घेतलेल्या बळींचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्ण संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. इस्रायलमधील शास्त्रज्ञांनी जीवघेण्या कोरोना व्हायरसवर (Coronavirus) लस (vaccine) विकसित केल्याचा दावा केला आहे. लवकरच याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, कोरोना व्हायरस कोविड-19 च्या लसची घोषणा होण्याची शक्यता आहे. इस्रायलची वेबसाइट Haaretz ने मेडिकल सोर्सच्या हवाल्याने गुरुवारी याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाच्या देखरेखीत काम करणारे इन्स्टिट्यूट फॉर बायोलॉजिकल रिसर्चमध्ये कोरोना व्हायरसवर रिसर्च सुरु आहे. या रिसर्चमध्ये इस्रायलच्या शास्त्रज्ञांना कोरोना व्हायरसचे गुण आणि जैविक तंत्रज्ञान समजून घेण्यात मोठं यश मिळालं आहे.आता त्यावर वैज्ञानिक क्षमतेसह एंटीबॉडीज लस विकसित करण्यात आली आहे.

हेही वाचा.. ऑनलाइन शॉपिंगही नको! प्लास्टिक पॅकेजिंगमधूनही येऊ शकतो कोरोना व्हायरस

रिपोर्टनुसार, विकसित करण्यात आलेल्या लसवर महत्त्वपूर्ण परीक्षण आणि प्रयोग करण्याची आवश्यकता आहे. त्यानंतरच ही लस रुग्णांसाठी किती सुरक्षित आहे, याबाबत स्पष्ट होईल. दरम्यान, कोरोना व्हायरसचं संक्रमन अनेक देशांमध्ये झालं आहे. चीननंतर कोरोना व्हायरसचे सर्वात जास्त रुग्ण इटलीत आढळले आहेत. यानंतर इराण, दक्षिण कोरिया, फ्रान्स, स्पेन, जर्मनी आणि भारतासह जवळपास 100 देशांमध्ये कोरोना व्हायरस पसरला आहे.

जगभरात कोरोनाव्हायरसचा संसर्ग वाढतो आहे. युरोपियन देशांमध्ये 35 कंपन्यांनी औषधं बनवत आहे. यूके सरकारने कोरोनाव्हायरसच्या लसीसाठी निधीही दिला आहे. जगभरात कोरोनाव्हायरसचे 1,18,180 रुग्ण आहेत. तर 4,292 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. फक्त चीनमध्ये 3,158 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर 80 हजारपेक्षा लोकं व्हायरसने पीडित आहेत.

हेही वाचा..'दारू प्या आणि कोरोनापासून दूर राहा' काय आहे यामागचं सत्य?

कोरोनाची लस घ्या आणि लाखो रुपये घेऊन जा..

चीनहून (China) जगभरात पसरलेल्या कोरोनाव्हायरसवरील (Coronavieus) उपचार जगभरातील शास्त्रज्ञ शोधत आहेत. लंडनच्या (London) शास्त्रज्ञांनी कोरोनाव्हायरसची लस तयार केल्याचा दावा केला आहे. या लसीची स्वत:वर चाचणी करून घेणाऱ्याला लाखो रुपये दिले जाणार आहेत.

डेली मेलने (Daily mail) दिलेल्या वृत्तानुसार, व्हाइटचॅपेलमधील (Whitechapel) क्विन मेरी बायोएंटरप्रायझेस इनोव्हेशन सेंटरने (Queen Mary BioEnterprises Innovation Centre) कोरोनाव्हायरसविरोधातील लसीच्या चाचणीसाठी 24 लोकांना बोलवलं आहे. जो कोणी या लसीची चाचणी स्वत:वर करून घेईल, त्याला 3,500 पाऊंड म्हणजे तब्बल 3 लाख रुपये दिले जाणार आहेत. मात्र त्यासाठी एक अट ठेवण्यात आली आहे, यासाठी त्या व्यक्तीला कोरोनाव्हायरसने संसर्ग करून घ्यावा लागेल.

ज्या व्यक्ती या चाचणीत सहभागी होतील त्यांच्या शरीरात कोरोनाव्हायरसचा कमजोर असा स्ट्रेन (strain) टाकला जाईल. ज्यामुळे त्या व्यक्तीमध्ये कोरोनाव्हायरस संक्रमणाची शक्यता वाढते. जेव्हा कोरोनाव्हायरसचा प्रभाव या व्यक्तीवर दिसून येईल, तेव्हा त्याच्यावर एचव्हीव्हो (Hvivo) कंपनीने तयार केलेल्या लसीची चाचणी केली जाईल.

एचव्हीवो कंपनीने सांगितलं की, '24 लोकांवर कोरोनाव्हायरस लसीची चाचणी केली जाईल, ज्यांना 14 दिवसांसाठी वेगळं ठेवलं जाईल. 2 आठवडे या कोरोना संक्रमित व्यक्तींवर काही परिणाम होतो का याचा अभ्यास केला जाईल' जगभरात कोरोनाव्हायरसचा संसर्ग वाढतो आहे. युरोपियन देशांमध्ये 35 कंपन्यांनी औषधं बनवत आहे. यूके सरकारने कोरोनाव्हायरसच्या लसीसाठी निधीही दिला आहे.

First published:

Tags: Corona virus, Coronavirus disease