Home /News /maharashtra /

शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीत नाराजीनाट्य? विरोधी पक्षनेतेपदावरुन जयंत पाटील नाराज

शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीत नाराजीनाट्य? विरोधी पक्षनेतेपदावरुन जयंत पाटील नाराज

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे विरोधी नेतेपक्षाची जबाबदारी दिली गेली. मात्र, या निर्णयामुळे आता राष्ट्रवादीमध्ये नाराजी असल्याचं समोर येत आहे.

    मुंबई 06 ऑगस्ट : शिवसेना आमदारांच्या बंडखोरीनंतर राज्यातील महाविका आघाडी सरकार कोसळलं. यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे विरोधी नेतेपक्षाची जबाबदारी दिली गेली. मात्र, या निर्णयामुळे आता राष्ट्रवादीमध्ये नाराजी असल्याचं समोर येत आहे. अजित पवार यांच्याकडे विरोधी पक्षाची जबाबदारी दिल्याने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नाराज आहेत. फडणवीसांसोबतच्या भेटीनंतरही स्टुडिओ घोटाळाप्रकरणी अस्लम शेख यांना नोटीस; भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम? पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्वात अनुभवी नेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी अनेक वर्षांपासून गृह, वित्त, ग्रामीण विकास यासह अनेक मंत्रालयांचं नेतृत्व केलं आहे. विधीमंडळ पक्षाचे गटनेते असलेले पाटील हे या निर्णयामुळे इतके नाराज होते, की त्यांनी अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्त करण्याचे पत्र सभापतींना देण्यास नकार दिला, असं राष्ट्रवादीच्या सूत्रांनी सांगितलं. यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी दोनदा फोन करून पाटलांना आठवण करून दिली, की राष्ट्रवादीच्या ५३ पैकी ३६ आमदारांनी विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवार यांना पाठिंबा देण्याच्या पत्रावर आधीच स्वाक्षरी केली आहे. पाटील यांनी या निर्णयावर नाराज असल्याचे औपचारिकपणे नाकारले आहे आणि ते त्यांच्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चाही खोडून काढली आहे. मात्र त्यांनी कबूल केलं की मला विरोधी पक्षनेते व्हायचं आहे, परंतु त्याचवेळी अजित पवार यांना या पदावर नियुक्त करण्याच्या निर्णयास मी स्वतःही पाठींबा दिल्याचंही ते म्हणाले. Amruta Fadnavis: 'कशी नशिबानं थट्टा आज मांडली' ऐकताच उद्धवजींचा चेहरा समोर येतो; अमृता फडणवीसांचा खोचक टोला अजित पवार यांना विरोधीपक्ष नेतेपदासाठी पाठिंबा देणारे पत्र मागण्यासाठी धनंजय मुंडे जयंत पाटील यांच्याकडे गेले होते. तेव्हा आपण थोड्याच वेळात पत्र देऊ असे पाटील म्हणाले परंतु त्यांनी पत्र दिले नाही. अखेर प्रफुल पटेल यांना जयंत पाटलांना दोन वेळा फोन करावा लागला. मात्र, '3 जुलै रोजी आमदारांची बैठक पार पडली, त्यात अजित पवार यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी देण्याचा निर्णय झाला. यानंतर दुसर्‍याच दिवशी आपण विधासभा अध्यक्षांकडे तसं पत्र दिल्याचं' जयंत पाटील यांनी सांगितलं.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Ajit pawar, Jayant patil

    पुढील बातम्या