Home /News /entertainment /

Amruta Fadnavis: 'कशी नशिबानं थट्टा आज मांडली' ऐकताच उद्धवजींचा चेहरा समोर येतो; अमृता फडणवीसांचा खोचक टोला

Amruta Fadnavis: 'कशी नशिबानं थट्टा आज मांडली' ऐकताच उद्धवजींचा चेहरा समोर येतो; अमृता फडणवीसांचा खोचक टोला

उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी झी मराठीवरील बस बाई बस या कार्यक्रमात विचारलेल्या प्रश्नांची भन्नाट उत्तर दिली. दरम्यान अमृता फडणवीसांनी या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची संधी देखील सोडली नाही.

पुढे वाचा ...
  मुंबई, 05 ऑगस्ट: आपल्या गाण्यांमुळे आपली नवी ओळख निर्माण करणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या झी मराठीवरील बस बाई बस कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. बस बाई बसच्या मंचावर सुबोध भावे आणि प्रेक्षकांच्या प्रश्नांची त्यांनी भन्नाट उत्तर दिलं. सोबत त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खोचक टोलाही लगावला. अमृता फडणवीस त्यांच्या बेधडक व्यक्त्यांमुळे कायम चर्चेत असतात. मात्र बस बाई बसच्या मंचावर केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आल्यात. महाराष्ट्राच्या राजकाराणात मागील काही महिन्यात अनेक घडामोडी घडल्यात. महाविकास आघाडी सरकार कोसळून शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून राजकारणाची सगळीच गणितच बदलून गेली आहेत. बस बाई बसच्या मंचावर सुबोध भावेनं अमृता फडणवीसांना अनेक मजेशीर प्रश्न विचारलेत ज्यात काही वैयक्तिक तर काही राजकारणाविषयी प्रश्न होते. सुबोध भावेनं एक प्रश्न विचारत अमृता फडणवीसांना पिंजरा सिनेमातील कशी नशीबानं थट्टा आज मांडली हे गाणं ऐकवलं. हे गाणं ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर लगेच कोणाचा चेहरा उभा राहतो असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर अमृता फडणवीसांनी कोणताही वेळ न घालवता थेट उद्धव ठाकरेंचं नाव घेतलं. हेही वाचा - Amruta Fadanavis: गळ्यात मंगळसूत्र घालायचं सोडून हातात घालण्यामागचं अमृता फडणवीसांचं भन्नाट लॉजिक ऐका अमृता फडणवीसांनी म्हटलंय, 'कशी नशीबानं थट्टा आज मांडली हे गाणं ऐकल्यावर माझ्या डोळ्यांसमोर श्री उद्धवजी ठाकरे यांचं नाव येतं.  त्यांच्याविषयी मला खूप मान सन्मान आहे. पण हे गाणं ऐकल्यावर मला त्यांच्याच चेहरा आठवला'. अशाप्रकारे अमृता फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांचा आदर राखत खोचक टिका करण्याची संधी सोडली नाही.
  अमृता फडणवीस यांनी स्वत: त्यांच्या सोशल मीडियावरुन बस बाई बस कार्यक्रमाचे काही फोटो शेअर केलेत.  'थोड़ी मजेदार, थोड़ी मिश्किल, बुरा ना मानो - ही आहे बस बाई बस ची मस्ती आणि किलबिल !, असं नेहमीप्रमाणे भन्नाट कॅप्शनही शेअर केलं आहे. बस बाई बसचा अमृता फडणवीसांचा भाग चांगला चर्चेत आला आहे. बस बाई बसच्या मंचावर अमृता फडणवीसांनी मजेदार प्रश्नांची बेधडक उत्तरं दिलीत.  मंगळसूत्र गळ्यात न घालता हातात घालण्यामागचं अमृता फडणवीसांचं भन्नाट लॉजिक ऐकून प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्यात. इतकंच नाही अमृता फडणवीसांनी प्लास्टिक सर्जरी केली आहे या विषयीही त्यांनी भन्नाट उत्तर दिलं आहे.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Devendra Fadnavis, Marathi entertainment, Uddhav tahckeray

  पुढील बातम्या