जळगाव 15 ऑक्टोबर : चोपडा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभासद नोंदणीवरून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांची चांगलीच कान उघडणी केली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अरुण भाई गुजराती यांच्यासमोरच जयंत पाटील यांनी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना सुनावलं. तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना चोपडा मतदारसंघ सोडून द्यायच्या आहे का? असा सवाल त्यांनी यावेळी केला. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय प्रदेशाध्यक्षांनी ही बैठक घेतली, यावेळी जयंत पाटील बोलत होते. राष्ट्रवादीच्या खासदाराची शिंदे गटाच्या मंत्र्यासोबत बंद दाराआड चर्चा, अजित पवार म्हणाले…. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, की चोपडा मतदारसंघात आपल्याला विधानसभा लढवायची आहे की सोडायची आहे? चोपडा तालुक्यात इतके कमी सभासद असतील तर कसे होणार? अरुणभाई गुजराथी असताना एवढी कमी संख्या कशी? कुणाकुणाची अब्रू घालवणार आहात तुम्ही? अशा शब्दांत त्यांनी पाणउतारा केला. प्रदेशाध्यक्ष पाटील पुढे म्हणाले की, चोपडा मतदारसंघात यावलचे तीन जि.प. गट येतात. आपल्याला विधानसभा लढवायची आहे की सोडायची आहे. आता तर तिथे आमदारही नाहीत.. आपले उमेदवार वळवी आले आहेत का? असा प्रश्नही त्यांनी विचारला. मात्र वळवी उपस्थित नव्हते. यामुळे जयंत पाटील यांचा पारा चढला. यानंतर त्यांनी चांगलंच सुनावलं. वैतागलेल्या जयंत पाटील यांनी थेट असा प्रश्न विचारला की, ते आपल्या पक्षात आहे का? यासोबतच वळवी सभासद नोंदणीला मदत करत आहेत का? असा प्रश्न त्यांनी विचारला. मात्र त्यावर तालुका अध्यक्ष काहीच बोलले नाहीत. ‘घरात बसून होणार नाही, निवडणुका समोरासमोर पण…’, गुलाबराव पाटलांचं उद्धव ठाकरेंनाच चॅलेंज धुळ्यात जयंत पाटलांसमोर कार्यकर्त्यांचा वाद - नुकतंच धुळ्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोर कार्यकर्त्यांची गटबाजी उफाळल्याचंही दिसून आलं होतं. राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांचा बॅनरवर फोटो न लावल्यावरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता. बॅनरवर फोटो न लावल्याने राष्ट्रवादीतील अनिल गोटे समर्थक कार्यकर्ते नाराज झाले होते. त्यानंतर या कार्यकर्त्यांनी राडा घातला. जयंत पाटील यांच्यासमोरच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने हा चर्चेचा विषय बनला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.