मालेगाव, 15 ऑक्टोबर : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर इन्कमिंग सुरूच आहे. अशातच राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी मंत्री उदय सामंत यांची बंद दाराआड चर्चा केली. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. पण, भेटीचा कोणतीही गैरअर्थ काढू नका, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.
मालेगावला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यासभेत विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी पत्रकारांशी बोलताना अजितदादांनी सुनील तटकरे आणि उदय सामंत यांच्या भेटीवर भाष्य केलं.
('घरात बसून होणार नाही, निवडणुका समोरासमोर पण...', गुलाबराव पाटलांचं उद्धव ठाकरेंनाच चॅलेंज)
'राजकीय जीवनामध्ये नेत्यांच्या भेटीगाठी घ्यावा लागत असतात, राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली असले. दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली असं कळलंय. पण या भेटीबाबत गैर अर्थ काढून बोलू नका, असं अजित पवार म्हणाले.
'शिवाय त्यांनी राज्य सरकार ने गोरगरिबांना दिवाळी निमित्त 100 रुपयात वस्तू देण्याच्या योजनेत मोठ्या प्रमाणात गौडबंगाल असल्याचा गंभीर आरोपही अजित पवार यांनी केला. राज्य सरकार ने गोरगरिबांना दिवाळी निमित्त 100 रुपयात वस्तू देण्याच्या योजनेवर प्रश्न उपस्थित केले असून या योजनेत शंभर टक्के गौडबंगाल असल्याचा आरोप अजितदादा यांनी केला. याबाबतची आकडेवारी घेत असून आकडेवारी मिळताच ती जनते समोर ठेवणार असल्याचे अजितदादा म्हणाले.
(अंधेरी पोटनिवडणुकीत 'मशाल' सोडणार साथ? ठाकरे पुन्हा गोत्यात!)
तसंच, सध्या महाराष्ट्रात अवघड परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी संकटात आहे, वाढत्या महागाईने जनता तर बेरोजगारमुळे तरुण पिढी त्रस्त झाली आहे, अशी टीकाही अजितदादांनी केली.
तर, केंद्र सरकार अल्पसंख्यांक समाजाला त्रास देण्याचे काम करीत असून आम्ही कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस संविधानाची रक्षा करण्यास सक्षम असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi news