सांगली, 27 नोव्हेंबर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मुलाचा लग्न सोहळा आज सांगलीच्या इस्लामपूर मध्ये पार पडत आहे. या लग्न सोहळ्यासाठी दिग्गज नेत्यांची हजेरी लावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्ष नेते अजित पवार, छत्रपती उदयनराजे, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब देसाई, मंत्री शंभूराजे देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, सभापती नरहरी झिरवळ, फौजिया खान, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, यांच्यासह मान्यवर मंडळी सध्या दाखल झाले आहेत.
दरम्यान जयंत पाटील आणि प्रतीक पाटील यांनी मागच्या दोन दिवसांपूर्वी गाण्याच्या तालावर ठेका धरला होता. याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला होता. इस्लामपूर शहरात आकर्षक कमानी उभ्या करण्यात आल्या आहेत. प्रतीक पाटील आणि अलिका यांचा फोटो लावण्यात आला आहे. जयंतराव पाटील यांचे चिरंजीव प्रतीक पाटील आणि उद्योगपती राहुल किर्लोस्कर यांची कन्या अलिका यांचा शुभ विवाह होत आहे.
हे ही वाचा : अखेर दापोलीतील तो रिसॉर्ट जमीनदोस्त, किरीट सोमय्यांनी केली मन की बात!
प्रतीक पाटील यांनी २०१४ पासून वाळवा-इस्लामपूर मतदारसंघात राजकीय कारकीर्द सुरू केली आहे. प्रतीक यांनी आपले शिक्षण लंडन येथे इंजिनीअरिंगमध्ये एमएस केले आहे. सध्या ते मतदारसंघात लक्ष देत आहेत.
राजारामनगर (इस्लामपूर) येथे या लग्न सोहळ्यास वाळवा तालुक्यासह संपूर्ण राज्यातून अनेक मंत्री. आमदार काँग्रेससह विविध पक्षातील दिग्गज नेते उपस्थित राहेत.
यासाठी इस्लामपूर येथील वाघवाडी फाट्याजवळ सुसज्ज असे चार हेलिपॅड तयार करण्यात आलेत. इस्लामपूर-बहे राजेबागेश्वरच्या पूर्वेस लग्न सोहळ्याची भव्य व सुंदर व्यवस्था केली आहे. इस्लामपूर-बहे रत्याच्या बाजूलाच मुख्य प्रवेश उभा केला आहे.
हे ही वाचा : तब्येतीचं कारण सांगून… राज ठाकरेंनी केली उद्धव ठाकरेंची नक्कल
जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक आणि उद्योगपती राहुल किर्लोसकर यांची कन्या अलिका यांचा आज विवाहसोहळा होत आहे. राजारामपूर येथे सांयकाळी साडेपाच वाजता हा विवाहसोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी राज्याच्या राजकारणातील दिग्गज नेते उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे.