जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / तब्येतीचं कारण सांगून... राज ठाकरेंनी केली उद्धव ठाकरेंची नक्कल

तब्येतीचं कारण सांगून... राज ठाकरेंनी केली उद्धव ठाकरेंची नक्कल

राज ठाकरेंनी केली उद्धव ठाकरेंची नक्कल

राज ठाकरेंनी केली उद्धव ठाकरेंची नक्कल

राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 27 नोव्हेंबर : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे. उद्धव यांनी पैसा आणि स्वार्थासाठी राजकारण केलं. त्यांनी कधीच कोणती भूमिका घेतली नाही. उलट मुख्यमंत्री असताना तब्बेतीचं कारण सांगून.. असं सांगत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांनी नक्कल केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा आज मुंबईतील गोरेगावमधील नेस्को मैदानावर पार पडली. यावेळी ते बोलत होते. राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे महाराष्ट्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेल्या आंदोलनं सर्वाधिक यशस्वी झाली आहेत. मात्र, मनसेचं यश लोकांच्या विस्मरणात जाण्यासाठी काही यंत्रणा काम करत आहे. टोलमुक्त करण्यासाठी राज्यात आपण आंदोलने केली. मात्र, ज्यांनी निवडणुकांआधी महाराष्ट्र टोलमुक्त करण्याची घोषणा केली. त्यांना कोणीच प्रश्न विचारत नाही. मनसेच्या आंदोलनावर एक पुस्तिका काढणार आहे.

राज्यात होणाऱ्या नोकऱ्यांची जाहिरात राज्यातील वृत्तपत्रात दिली जात नव्हती. ज्यावेळी परप्रांतीय विद्यार्थी महाराष्ट्रात परीक्षा द्यायला आले. त्यावेळी हे प्रकरण मनसेने उचलून धरलं. रेल्वे भरतीसाठी युपीपेक्षा बिहारचे लोक जास्त आले होते. हिंदी चॅनेल्सवाल्यांनी मनसेविरोधात रान उठवलं होतं. असं असतानाही भाजपने उत्तरभारतीयांना तिकीटं दिली. मनसेची आंदोलनं बदनाम केली जात आहे. वाचा - अजूनही काहींना चरबी.. भोंग्यावर राज ठाकरेंची आक्रमक भूमिका, मनसैनिकांना दिला आदेश मुख्यमंत्री पदावर असताना तब्बेतीचं कारण सांगून, असं सांगत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. शिंदे यांनी रात्रीत कांडी फिरवली आणि घराबाहेर काढलं. उद्धव ठाकरे यांनी कधीच भूमिका घेतली नाही. पाकिस्तानी कलाकारांविरोधात मनसेनेच भूमिका घेतली. राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे. पैसा आणि स्वार्थासाठी राजकारण केलं. त्यांनी कधीच कोणती भूमिक घेतली नसल्याचंही राज ठाकरे यांनी टीका केली.

News18लोकमत
News18लोकमत

राज ठाकरे पुढे म्हणाले, ‘‘आजपर्यंत बाळासाहेब जे बोलत आले की, मशिदींवरील भोंगे उतरवले गेले पाहिजेत. मनापासून त्यांची ती इच्छा होती. पूर्ण आपण (मनसेने) केली. याचं कारण आपण भोंगे काढायला नाही सांगितले, तर नाही काढले तर हनुमान चालीसा लावू. यामुळे हे निघाले.’’  त्यांनी पुन्हा एकदा मशिदीचा मुद्दा उचलत कार्य कार्यांना सांगितलं आहे के, जिथे जोरात भोंगे वाजत आहेत. त्याची पोलिसात तक्रार करा. तसेच पोलिसांनी यावर काही केलं नाही, तर ट्रकवर स्पीकर लावून हनुमान चालीसा लावा, असं ते कार्यकर्त्यांना म्हणाले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात