मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणी मोठी अपडेट, ED चा रत्नागिरी जिल्हा बँकेला ई-मेल!

जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणी मोठी अपडेट, ED चा रत्नागिरी जिल्हा बँकेला ई-मेल!


रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जरंडेश्वर साखर कारखान्याला गेल्या महिन्यात 8 कोटी 75 लाखांचा कर्जपुरवठा केला आहे

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जरंडेश्वर साखर कारखान्याला गेल्या महिन्यात 8 कोटी 75 लाखांचा कर्जपुरवठा केला आहे

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जरंडेश्वर साखर कारखान्याला गेल्या महिन्यात 8 कोटी 75 लाखांचा कर्जपुरवठा केला आहे

रत्नागिरी, 13 जुलै : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री (Deputy CM) अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी संबंधित जरंडेश्वर साखर (Jarandeshwar Sugar Factory )कारखान्यावर ईडीने कारवाईचा बडगा उगारला आहे. आता रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती  सहकारी बँकेच्या अध्यक्षांनी ईडीने माहिती मागितली असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ईडीचं पत्र प्राप्त झालं आहे. जरंडेश्वर साखर कारखाना कर्ज पुरवठा प्रकरणात हे पत्र आलं आहे. कशा पद्धतीने कर्ज पुरवठा करण्यात आला, तारण काय घेण्यात आलं आहे, आदी माहिती ईडीने मागितली असून, तसा ईमेल रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आला आहे. या वृत्ताला बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनीही दुजेरा दिला आहे.

'त्या चर्चेला अर्थ नाही', निलेश राणेंनी भाऊ नितेश यांचाच दावा काढला खोडून!

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जरंडेश्वर साखर कारखान्याला गेल्या महिन्यात 8 कोटी 75 लाखांचा कर्जपुरवठा केला आहे. दरम्यान, आता ईडीने जिल्हा बँकेकडून या कर्जपुरवठ्यासंदर्भात माहिती मागविली आहे.

दरम्यान,  ईडीने 1 जुलै रोजी साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखाना जप्त केला. कारखान्यावर कारवाई केल्यानंतर आता हा कारखाना खरेदीसाठी ज्या बँकांनी कर्ज दिलं होतं त्या बँकांना ईडीने नोटीस पाठवली आहे. ईडीकडून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड (Pune district central cooperative bank) आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड (Satara district central cooperative bank) या दोन्ही बँकांना नोटीस बजावली आहे. कोरेगावच्या जरंडेश्वर साखर कारखाना कर्ज प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ही नोटीस बजावण्यात आली आहे.

कमाई करण्याची खास संधी देतेय RBI! या स्कीममध्ये खातं उघडा,पैसेही राहतील सुरक्षित

सातारा जिल्हा बँकेने 96 कोटीचे कर्ज दिले असल्याच्या खुलास्याबाबत ही नोटीस बजावण्यात आली. सध्या जिल्हा बँक राष्ट्रवादीच्या ताब्यात असून पुणे जिल्हा बँकेसह जरंडेश्वरला चार बँकांनी कर्ज दिल्याची माहितीसमोर आली आहे. आता या कर्ज प्रकरणात सातारा जिल्हा बँकेचाही सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

जरंडेश्वर साखर कारखान्याने बँकेचे थकीत कर्ज न भरल्याने कारखाना जप्त करण्यात आला होता. माजी आमदार आणि महलूसलमंत्री शालिनीताई पाटील या कारखान्याच्या संस्थापक आणि चेअरमन होत्या. साताऱ्यातील कोपरगाव येथील जरंडेश्वर साखर कारखाना थकीत कर्जामुळे लिलावात काढला होता. शिखर बँकेने या कारखान्याचा लिलाव केला होता. मात्र, हा लिलाव हेतूपरस्कर असल्याचा आरोपही करण्यात आला होता. ज्या कंपनीची वार्षिक उलाढाल एक कोटींहून कमी होती त्या कंपनीने हा 60 कोटी रुपयांहून अधिक किंमतीचा साखर कारखाना खरेदी केला होता. या संपूर्ण प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याने ईडीने ही कारवाई केली आहे.

Explainer : प्रियांका विरुद्ध राहुल गांधी खरंच भावंडांमध्ये वाद आहे का?

याबाबत अण्णा हजारे यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडीने आपला गुन्हा दाखल करत कारवाई केली आहे.

First published:
top videos

    Tags: ED