मराठी बातम्या /बातम्या /मनी /

कमाई करण्याची खास संधी देतेय RBI! या स्कीममध्ये खातं उघडा, पैसेही राहतील सुरक्षित

कमाई करण्याची खास संधी देतेय RBI! या स्कीममध्ये खातं उघडा, पैसेही राहतील सुरक्षित

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) आरबीआय रिटेल डायरेक्ट (RBI Retail Direct) च्या योजनेची घोषणा केली आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) आरबीआय रिटेल डायरेक्ट (RBI Retail Direct) च्या योजनेची घोषणा केली आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) आरबीआय रिटेल डायरेक्ट (RBI Retail Direct) च्या योजनेची घोषणा केली आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 13 जुलै: सध्याच्या काळात गुंतवणूक आणि बचत या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. दरम्यान अनेक गुंतवणूकदारांकडून कमी जोखीम असणाऱ्या पर्यायांमध्ये गुंतवणूक केली जाते. विशेषत: सरकारी गॅरंटी असणाऱ्या पर्यायात गुंतवणूक केली जाते. तुम्ही देखील गुंतवणुकीसाठी एखादा पर्याय शोधत असाल तर रिझर्व्ह बँक (Reserve Bank of India) एक चांगली संधी देत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) आरबीआय रिटेल डायरेक्ट (RBI Retail Direct) च्या योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत गुंतवणुकदारांना गव्हर्नमेंट सिक्योरिटीजसह एकाच ठिकाणी गुंतवणुकीची संधी मिळेल. विशेष म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या या योजनेत खाते उघडण्यासाठी व व्यवस्थापनासाठी कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. त्याच वेळी, नोंदणीकृत गुंतवणूकदारांना पेमेंट गेटवेसाठी शुल्क भरावे लागेल.

हे वाचा-खरेदी करा स्वस्त सोनं, मोदी सरकार देत आहे गुंतणुवकीची संधी; काय सांगतात तज्ज्ञ?

तुम्ही हे खातं ऑनलाइन उघडू शकता. केंद्रीय बँकेने असं म्हटलं आहे की रिटेल गुंतवणूकदार रिझर्व्ह बँकेकडे रिटेल डिरेक्ट खातं (RDG Account) उघडू शकतात. गव्हर्नमेंट सिक्योरिटीजमध्ये रिटेल पार्टनरशीप वाढवण्यासाठी सरकारने 'द आरबीआय रिटेल डिरेक्ट सुविधे'ची घोषणा केली होती. या योजनेचा उद्देश सरकारी सिक्युरिटीजची पोहोच सुधारणे आहे. यासह किरकोळ गुंतवणूकदारांची ऑनलाइन पोहोचही वाढविली जाणार आहे. यात प्राथमिक आणि दुय्यम दोन्ही बाजारांचा समावेश आहे.

कुणाला उघडता यईल खातं?

RBI च्या मते यामध्ये सिंगल आणि जॉइंट दोन्ही प्रकारचं खातं उघडता येईल. तुम्ही इतर कोणत्याही किरकोळ गुंतवणूकदारासह आपले खाते उघडू शकता, परंतु त्यासाठी पात्रतेचे निकष आपण पूर्ण केले पाहिजेत.

किरकोळ गुंतवणूकदारांना भारतात बचत बँक खाते, पॅन किंवा केवायसी हेतूंसाठी अधिकृतपणे वैध दस्तावेज असणं आवश्यक आहे. रिटेल डायरेक्ट प्लॅन अंतर्गत नोंदणी करण्यासाठी  आणि आरडीजी खातं बनवण्यासाठी वैध ईमेल आयडी आणि मोबाइल क्रमांकाची आवश्यक आहे.

First published:

Tags: Investment, Money, Rbi, Rbi latest news