मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /झेडपी शाळांतून 'चिकनी चमेली, मुन्नी, शीला' होणार हद्दपार, आयटेम साँगवर बंदीचा निर्णय

झेडपी शाळांतून 'चिकनी चमेली, मुन्नी, शीला' होणार हद्दपार, आयटेम साँगवर बंदीचा निर्णय

रत्नागिरीच्या नव्या जिल्हा परिषद अध्यक्षांनी स्नेहसंमेलनातून आयटेम साँगना बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

रत्नागिरीच्या नव्या जिल्हा परिषद अध्यक्षांनी स्नेहसंमेलनातून आयटेम साँगना बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

रत्नागिरीच्या नव्या जिल्हा परिषद अध्यक्षांनी स्नेहसंमेलनातून आयटेम साँगना बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

रत्नागिरी, 30 जानेवारी : मुन्नी बदनाम हुई, शीला की जवानी, चिकनी चमेली अशी गाणी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शाळांमधून हद्दपार होणार आहेत. शाळेच्या स्नेहसंमेलनातून रेकॉर्ड डान्स हा प्रकार नेहमी पाहायला मिळतो. त्यातही लोकप्रिय हिंदी- मराठी गाण्यांवर विद्यार्थी थिरकताना दिसतात. पण कोवळ्या वयातल्या मुलांवर या गाण्यांमुळे काय संस्कार होणार असा विचार करून रत्नागिरीच्या नव्या जिल्हा परिषद अध्यक्षांनी स्नेहसंमेलनातून आयटेम साँगना बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून रत्नागिरीच्या कुठल्याही झेडपीच्या शाळेत अशी आयटेम साँग वाजणार नाहीत. रोहन बने यांची जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून नुकतीच नेमणूक झाली आहे. मराठी लोकसंस्कृती टिकावी, मुलांना त्याची ओळख व्हावी यासाठी अशाच गाण्यांना प्रोत्साहन देण्यात येईल. आयटेम साँग गॅदरिंगला चालणार नाही, असा निर्णय बने यांनी घेतला आहे. मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, आपली लोकसंस्कृती टिकावी म्हणून निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. हा निर्णय जिल्हा परिषदेच्या जवळपास अडीच हजार शाळांसाठी असेल.

हेही वाचा - नाईट लाईफ... ते काय असतं? सैराटफेम आर्चीचा ‘निरागस’ प्रश्न

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या या निर्णयाचं शिक्षक आणि पालकांनीही स्वागत केलं आहे. या निर्णयामुळे शालेय जगतात रत्नागिरी जिल्हा परिषदेची चर्चा सुरू आहे. टीव्ही आणि सोशल मीडियावरून आयटम साँग लोकप्रिय असतात आणि त्यामुळेच शालेय वयातल्या मुलांनाही त्याची भुरळ पडू शकते. अश्लील हावभाव, अंगप्रदर्शन आणि स्त्रीला वस्तू म्हणून दाखवणाऱ्या आयटेम साँगला बंदी घालून रत्नागिरी जिल्हा परिषदेने नवा पायंडा पाडला आहे हे खरं. पण यातून मुलांवर खरंच चांगले संस्कार होणार का आणि सोशल मीडिया आणि टीव्हीवरच्या प्रदर्शनाला कसं रोखायचं हा खरा प्रश्न आहे.

---------------

अन्य बातम्या

धक्कादायक! 'तुकडे तुकडे'ची भाषा बोलणाऱ्या शरजीलला करायचा होता 'इस्लामी भारत'

धोकादायक कोरोना VIRUSचा खेडमधील मुलींना फटका, भुकेने होत आहेत हाल

अ‍ॅपल वॉचने दिला Heart Attack चा Alert; तरुणाचा मृत्यू टळला, काय घडलं नेमकं?

First published:

Tags: Ratnagiri