अ‍ॅपल वॉचने दिला Heart Attack चा Alert; तरुणाचा मृत्यू टळला, काय घडलं नेमकं?

अ‍ॅपल वॉचने दिला Heart Attack चा Alert; तरुणाचा मृत्यू टळला, काय घडलं नेमकं?

अ‍ॅपलच्या स्मार्ट वॉचमुळे तरुणाचा जीव वाचला असून यासाठी त्याने वॉचचे आभार मानले आहेत.

  • Share this:

क्वालालांपूर (मलेशिया), 29 जानेवारी : आपल्या मनगटावर राहून अनेक गोष्टींची आपल्याला आठवण आणि माहिती करून देणारं स्मार्ट वॉच आता अनेकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक झालं आहे. पण, ते कोणाचा जीवही वाचवू शकतं; असं कधी तुम्ही ऐकलं आहे का? हो, असं घडलं आहे. अ‍ॅपलच्या स्मार्ट वॉचमुळे तरुणाचा जीव वाचला असून यासाठी त्याने स्मार्टवॉचचे आभारही मानले आहेत. आता तुम्ही म्हणाल, नेमकं या अ‍ॅपलच्या स्मार्ट वॉचनं केलं तरी काय?

तरुणाला मिळाला अलर्ट

मलेशियामधल्या 20 वर्षीय फरहत हनीफ या तरुणानं 'अ‍ॅपल वॉच सिरीज 4' खरेदी केला. आकर्षक दिसणाऱ्या या वॉचच्या सर्वच फिचर्सबद्दल हनीफला कल्पना नव्हती. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात हनीफला वॉचनं हृदयाचे ठोके सामान्य पद्धतीने काम करत नसल्याचा अलर्ट पाठवला. परंतु, त्यावेळी विमानातून प्रवास करत असल्याने त्याला प्रवासाचा तणाव समजून दुर्लक्ष केले. परंतु, घरी विश्रांती करत असताना पुन्हा एकदा हा अ‍ॅलर्ट हनीफला आला. वॉचमध्ये बिघाड असल्याचे समजून त्याने एकदा वॉच रिसेट केला. परंतु, सातत्यानं हा अ‍ॅलर्ट येऊ लागल्यावर त्याने आरोग्याची तपासणी केली असता, भयावह गोष्ट समोर आली.

हनीफने तपासणी केली असता, इक्टॉपिक रिदम म्हणजेच हृदयाचे असामान्य ठोके पडत असल्याचं समोर आलं.

वॉचचा अलर्ट घेतलं गांभीर्याने

हृदयाचे असामान्य ठोके किंवा नाडी नॉर्मल नाही, हे लक्षात येताच त्याला गांभीर्य कळलं. याकडे वेळेत लक्ष दिले नाही तर, हार्ट अटॅक येण्याचीही शक्यता अधिक असते. तुम्ही व्यायाम न करताही किंवा शरीराची अधिक हालचाल न करताही हृदयाचे ठोके प्रति मिनिटाला 120 पेक्षा अधिक असतात तेव्हाच तुम्हाला अ‍ॅपल वॉच अलर्ट देतो. अ‍ॅपल वॉचच्या अलर्टमुळे हनीफवरचा मोठा धोका टळला आहे. हनीफने यासाठी अ‍ॅपल वॉचचे आभार मानले असून तो सध्या उपचार घेत आहे.

याआधाही ‘अपल वॉच-4’मुळे 67 वर्षीय व्यक्तीला वेळेत रुग्णालयात दाखल करता आले आणि यामुळे व्यक्तीचे प्राणही वाचले आहेत.

---------------------------

अन्य बातम्या

नाईट लाईफ... ते काय असतं? सैराटफेम आर्चीचा ‘निरागस’ प्रश्न

काय म्हणावं याला! वडिलांकडे 98 कोटींची संपत्ती अन् मुलगा राहतोय भाड्याच्या घरात

पोटात दुखायचं म्हणून मुलीला केलं अ‍ॅडमिट, किडनीपासून अन्ननलिकेपर्यंत सापडलं...

First published: January 30, 2020, 7:23 PM IST

ताज्या बातम्या