'तुकडे तुकडे'ची भाषा बोलणाऱ्या शरजीलला करायचा होता 'इस्लामी भारत', पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुलासा

'तुकडे तुकडे'ची भाषा बोलणाऱ्या शरजीलला करायचा होता 'इस्लामी भारत', पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुलासा

शरजील इमाम कट्टरतावादी विचारसरणीचा असून भारत इस्लामी राष्ट्र व्हावं असं मानणारा आहे अशी कबुलीच त्यांनं पोलिसांसमोर दिल्याचं सूत्रांकडून कळतंय.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 जानेवारी : चिथावणीखोर भाषणाबाजी करण्याच्या आरोपाखाली शरजील इमामला पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर तो पोलिसांसमोर आता पोपटासारखा बोलू लागला आहे. बिहारच्या जेहानाबादमधून शरजीलच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. दिल्ली पोलिसांनी त्याची चौकशी केली तेव्हा अनेक धक्कादायक खुलासे आता समोर येत आहेत. शर्जील इमाम कट्टरतावादी विचारसरणीचा असून भारत इस्लामी राष्ट्र व्हावं असं मानणारा आहे अशी कबुलीच त्यांनं पोलिसांसमोर दिल्याचं सूत्रांकडून कळतंय. त्याच्या या कबुलीनं त्याचे खतरनाक मनसुबे उघडकीस आलंय.

२५ जानेवारी रोजी अलीगड मुस्लिम विद्यापीठात शरजीलनं चिथावणीखोर भाषण दिलं होतं. प्रक्षोभक वक्तव्य भाषण दिल्यानंतर त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच त्यानं पळ काढला. पोलीसांनी त्याला बिहारच्या जेहानाबादमध्ये बेड्या ठोकल्या. दिल्ली पोलिस सध्या त्याची कसून चौकशी करत आहेत. या चौकशीत त्यानं पोलिसांसमोर अनेक धक्कादायक खुलासे केल्याचं कळतंय.

चिथावणीखोर वक्तव्य भोवलं

चिथावणीखोर वक्तव्यानंतर देशद्रोहाचा गुन्हा देशविरोधी चिथावणीखोर वक्तव्य करणं शर्जील इमामला भोवलंय. 'आपल्याकडे संघटित लोक असते तर आसामला भारतापासून कायमचं वेगळं केलं असतं.' शरजीलच्या याच वक्तव्यानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्याच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी दबाव वाढत होताय. अखेर दिल्ली पोलिसांसह, एनआयएनेदेखील अनेक ठिकाणी छापे टाकून त्याच्या मुसक्या आवळल्या.

कोण आहे शरजील इमान ?

शरजील इमाम बिहारच्या जहानाबादचा राहणारा आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या सेंटर फॉर हिस्टॉरिकल स्टडीजचा तो विद्यार्थी असल्याचं कळतंय. अलीगढ मुस्लिम विद्यापीठात नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीविरोधातील आंदोलनात शरजील सहभागी झाला होता. तिथंच त्यानं देशविरोधी वक्तव्य केलं. त्यानंतर शरजीलविरोधात आसाम आणि उत्तर प्रदेशमध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

First published: January 30, 2020, 8:15 PM IST

ताज्या बातम्या