मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मुंबई हायकोर्टाने परवानगी नाकारल्यानंतर शिंदे गट आता थेट सुप्रीम कोर्टात जाणार?

मुंबई हायकोर्टाने परवानगी नाकारल्यानंतर शिंदे गट आता थेट सुप्रीम कोर्टात जाणार?

उद्धव ठाकरे यांच्या गटाला परवानगी मिळाल्यानंतर शिंदे गट सुप्रीम कोर्टात जाईल, अशा चर्चांना उधाण आलंय. शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी देखील याबाबतची प्रतिक्रिया दिली. त्यामुळे शिंदे गट सुप्रीम कोर्टात जाणार, अशी चर्चा सुरु झाली. याबद्दल शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी 'न्यूज 18 लोकमत'ला प्रतिक्रिया दिली.

पुढे वाचा ...
  • Published by:  Chetan Patil
मुंबई, 23 सप्टेंबर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटातील सेनेला आज मुंबई हायकोर्टात सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई हायकोर्टात आज मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात दसरा मेळाव्यासाठी नेमकी कुणाला परवानगी मिळावी या मुद्द्यासंबंधित याचिकांवर सुनावणी झाली. या सुनावणीत मुंबई महापालिकेचे वकील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांचे वकील आणि ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांच्या वकिलांनी आपापल्या पक्षकारांची भूमिका मांडली. तीनही पक्षकारांचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने शिंदे गटाची मध्यस्थी याचिका फेटाळली. कोर्टाने सदा सरवणकर यांची याचिका फेटाळली आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची हमी घेण्याच्या अटीवरुन उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाने ही लढाई जिंकली. उद्धव ठाकरे यांच्या गटाला परवानगी मिळाल्यानंतर शिंदे गट सुप्रीम कोर्टात जाईल, अशा चर्चांना उधाण आलंय. शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी देखील याबाबतची प्रतिक्रिया दिली. त्यामुळे शिंदे गट सुप्रीम कोर्टात जाणार, अशी चर्चा सुरु झाली. याबद्दल शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी 'न्यूज 18 लोकमत'ला प्रतिक्रिया दिली. "मी असं कुठे म्हटलेलं आहे आणि सर्वोच्च न्यायालयात जाणार असं कोणी सांगितलेलं आहे? हा निर्णय एकनाथ शिंदे घेऊ शकतात. ते आमच्या गटाचे मुख्य नेते आहेत. आणि सुप्रीम कोर्टात जाऊ नये असं हायकोर्टाने कुठे म्हटलं आहे? प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी सुप्रीम कोर्टात जाण्याबद्दल गांभीर्याने विचार करु, असं म्हटलं असेल तरी त्यांना सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी वरिष्ठांची संमती घ्यावी लागेल. मुख्य नेत्यांची संमती मिळाली ते जातीलही. दसरा मेळाव्यासाठी आधी कुणी अर्ज केला याच मुद्द्यावरुन निकाल लागला आहे. शिवसेना मुळ कुठली आहे? हा वाद वेगळा आहे. त्याचा या याचिकेशी काहीच संबंध नाही. ठाकरे गटाने चांगल्या वर्तवणुकीची हमी दिलेली आहे. आम्हाला या याचिकेच्या निकालाचा काहीच धक्का बसलेला नाही. ते ज्याप्रकारे वागत आहेत ते पाहता हायकोर्ट कदाचित त्यांची परवानगी नाकारेल", अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली. मुंबई हायकोर्टाने नेमका काय निकाल दिला? तीनही पक्षकारांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टाने निकाल वाचण्यास सुरुवात केली. मुंबई हायकोर्टाने शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची मध्यस्थी याचिका फेटाळली. अर्ज नाकारण्याचा पालिकेचा निर्णय योग्य होता. कायदा-सुव्यवस्थेचा विचार करुनच पालिकेने परवानगी नाकारली, असं निरीक्षण कोर्टाने नमूद केलं. यावेळी पालिकेने 2017 मध्ये कशी परवानगी दिली हे पाहवं लागेल, असं न्यायाधीश म्हणाले. 2016 च्या आधी शिवसेनेला परवानगी मिळाली होती. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा अनेक वर्षांपासून होतोय. खरी शिवसेना कुणाचा यात आम्हाला जायचं नाही. 22 आणि 26 दोन्ही तारखेचे अर्ज पालिकेला आलेले होते. पालिकेकडून शिवसेनेला प्रतिसाद न मिळाल्याची याचिका आहे, असं न्यायाधीशांनी नमूद केलं. (उद्धव ठाकरे गटाला सर्वात मोठा दिलासा, शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी परवानगी) पोलिसांनी पालिकेला कायदा आणि सुव्यवस्थेचा २१ तारखेला अहवाल दिला. कायदा-सुव्यवस्थेमुळे परवानगी न देण्याचा अहवाल पोलिसांनी दिला होता, असं कोर्टाने म्हटलं. यावेळी कोर्टाने पालिका प्रशासनालाही सुनावलं. पालिकेचा निर्णय अंतिम नाही. दुसऱ्या गटाच्या अर्जाबाबत पालिकेला माहिती होतं. मुंबई पालिकेचा निर्णय तथ्यात्मक नाही. मुंबई पालिकेने कायद्याचा दुरुपयोग केला, असं कोर्टाने स्पष्ट म्हटलं. गेल्या सात दशकांपासून शिवसेनेचा दसरा मेळावा होतोय. दसरा मेळाव्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा कधीच प्रश्न निर्माण झालेला नाही. त्यामुळे यावर्षी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही ना? अशी हमी कोर्टाने मागितली. त्यावर ठाकरे गटाने हमी दिली. त्यानंतर कोर्टाने ठाकरे गटाला दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिली.
First published:

Tags: Eknath Shinde, Uddhav thackeray

पुढील बातम्या