जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Eknath Shinde : एकनाथ शिंदेच्या नॉट रिचेबल प्रकरणावर अपक्ष आमदारांची रिचेबल भूमिका, शिवसेनेला पाठींबा दिलेल्या अपक्षांची भूमिका काय?

Eknath Shinde : एकनाथ शिंदेच्या नॉट रिचेबल प्रकरणावर अपक्ष आमदारांची रिचेबल भूमिका, शिवसेनेला पाठींबा दिलेल्या अपक्षांची भूमिका काय?

Eknath Shinde : एकनाथ शिंदेच्या नॉट रिचेबल प्रकरणावर अपक्ष आमदारांची रिचेबल भूमिका, शिवसेनेला पाठींबा दिलेल्या अपक्षांची भूमिका काय?

राज्यात काल विधानपरिषदेच्या (mlc election maharashtra) निवडणुकांचा निकाल लागला यामध्ये महाविकास आघाडीला (mahavikas aghadi) धक्का बसला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 21 जून : राज्यात काल विधानपरिषदेच्या (mlc election maharashtra) निवडणुकांचा निकाल लागला यामध्ये महाविकास आघाडीला (mahavikas aghadi) धक्का बसला. दरम्यान याबाबत चर्चा सुरू असतानाच महाविकास आघाडी सरकारवर सर्वात मोठं संकट ओढावलं आहे. नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारले आहे. शिंदे त्यांच्या समर्थक आमदारांसह सूरतमधील हॉटेलमध्ये आहेत. यांच्यासोबत अनेक आमदार असल्याचे बोलले जात आहे. याचबरोबर शिवसेनेला पाठींबा देणाऱ्या आमदारांनीही आपल्या भूमिका मांडण्यास सुरुवात केली आहे. अपक्ष आमदार गीता भारत जैन (geeta bharat jain) (Independent MLA) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.  

जाहिरात

त्या म्हणाल्या की, राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता अनेक पत्रकारांनी तसेच कार्यकर्त्यांनी संपर्क साधला असून भूमिकेबद्दल विचारणा केली. मी सगळ्यांना सांगू इच्छीते कि पुढील वाटचालीबद्दल जो काही निर्णय असेल तो सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करून योग्य वेळी घेण्यात येईल. असे त्या म्हणाल्या याचबरोबर त्या वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी निघाल्या असल्याचे बोलले जात आहे.

हे ही वाचा :  एकनाथ शिंदेंशी संपर्क झाला, भूकंप होणार नाही, संजय राऊत यांचं मोठ विधान

त्यापाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील राजन विचारे (Rajan Vichare) आणि  डॉ, श्रीकांत शिंदे  (Shrikant Shinde) हे  नॉट रिचेबल आहेत. यापैकी श्रीकांत शिंदे हे एकनाथ शिंदे यांचे पूत्र आहेत. ते सध्या दिल्लीमध्ये असल्याची माहिती आहे. सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं खासदारांना तातडीनं मुंबईत बोलावलं आहे.त्यावेळी हे खासदार नॉट रिचेबल असल्यानं शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे.

जाहिरात

एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून खदखद सुरू होती, असं समोर आलं आहे. मराठा समाजाच्या विषयावरून ही खदखद टोकाला गेली होती. यातून एकनाथ शिंदे यांना बाजूला करून मराठा समाजाची थेट मनं जिंकण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्याकडून सुरू होता.त्यासाठी विनायक राऊत यांना पुढे करून मराठा समाजाच्या नेत्यांशी बैठका सुरू होत्या.

जाहिरात

हे ही वाचा :  शिवसेना फुटली? औरंगाबादमधील 6 आमदार नॉट रिचेबल

येत्या दोन दिवसात मराठा समाजाच्या नेत्यांशी मुख्यमंत्री थेट बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार होते. मराठा समाजाचे शैक्षणिक प्रश्न आणि नोकर भरती बाबत ही बैठक होणार होती. त्यासाठी एकनाथ शिंदेना डावलून विनायक राऊत यांना मुख्यमंत्र्यांनी पुढे केले होते. मुंबईतील एका हॉटेलमध्ये या गाठीभेटी झाल्या होत्या. मराठा क्रांती मोर्चाला याबाबत पत्रही मुख्यमंत्र्यांनी द्यायला लावलं होतं. हे पत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती लागले आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात