Home /News /maharashtra /

BREAKING : शिवसेना फुटली? औरंगाबादमधील 6 आमदार नॉट रिचेबल

BREAKING : शिवसेना फुटली? औरंगाबादमधील 6 आमदार नॉट रिचेबल

विशेष म्हणजे, याच महिन्यात उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादेत विराट सभा घेतली होती.

विशेष म्हणजे, याच महिन्यात उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादेत विराट सभा घेतली होती.

विशेष म्हणजे, याच महिन्यात उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादेत विराट सभा घेतली होती.

    औरंगाबाद, 21 जून :  शिवसेनेमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे 11 आमदारांना घेऊन गुजरातमध्ये (eknath shinde in surat) पोहोचले आहे. त्यानंतर आता शिवसेनेचे अनेक आमदार हे नॉट रिचेबल असल्याचे समोर आले आहे. औरंगाबादमधील 6 आमदार हे नॉट रिचेबल असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, याच महिन्यात उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादेत विराट सभा घेतली होती. एकनाथ शिंदे हे 11 आमदारांना घेऊन गुजरातमध्ये पोहोचले आहे. त्यानंतर आता शिवसेनेचे राज्यातील काही आमदार हे नॉट रिचेबल असल्याचे समोर आले आहे.  उस्मानाबादेतील शिवसेनेचे उमरगा लोहारा आमदार ज्ञानराज चौगुले हे नॉट रिचेबल आहे. आमदार चौगुले हे गेली 3 टर्म सलग सेनेचे आमदार असून ते एकनाथ शिंदे समर्थक म्हणून ओळख जातात.  सलग 3 वेळा आमदार असतानाही मंत्रिपद न मिळाल्याने चौगुले नाराज होते. चौगुले यांचे दोन्ही नंबर बंद आहे. तर बुलडाण्यातील मेहकरचे शिवसेना आमदार संजय रायमूलकर आणि बुलडाणाचे शिवसेना आमदार संजय गायकवाड नॉट रिचेबल आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील शिवसेनेचे दोन्ही आमदार संजय नॉट रिचेबल आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोकणमधील २ आमदार सोबत आहे. ठाण्यातील 2 आमदार सोबत आहे, अशी माहिती समोर आली आहे. तर नांदेड जिल्ह्यातील उत्तरचे शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांचा फोन बंद आहे. बालाजी कल्याणकर हे एकनाथ शिंदेंसोबत असल्याची चर्चा आहे. स्वीय सहाय्यकाचे फोनही बंद  असल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. एकनाथ शिंदे दुपारी टापत्रकार परिषदेत मांडणार बाजू! विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे 11 आमदारांना घेऊन गुजरातमध्ये पोहोचले आहे. गुजरात सरकारच्या सुरक्षेखाली एकनाथ शिंदे आपल्या आमदारांसोबत आहे. आता दुपारी 2 वाजता एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडणार आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Aurangabad, Eknath Shinde, Maharashtra politics, Shiv sena, Uddhav thackeray, Vidhan parishad maharashtra

    पुढील बातम्या