मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'मी शिक्षकाचा मुलगा मला संस्कार शिकवू नये', पडळकरांचं थोरातांच्या कन्येला प्रत्युत्तर

'मी शिक्षकाचा मुलगा मला संस्कार शिकवू नये', पडळकरांचं थोरातांच्या कन्येला प्रत्युत्तर

 'पात्रतेपेक्षा जास्त मिळाले की असं होतं. आपल्या भाषेवरून आपल्या संस्कारांची ओळख होती

'पात्रतेपेक्षा जास्त मिळाले की असं होतं. आपल्या भाषेवरून आपल्या संस्कारांची ओळख होती

'पात्रतेपेक्षा जास्त मिळाले की असं होतं. आपल्या भाषेवरून आपल्या संस्कारांची ओळख होती

  • Published by:  sachin Salve

सोलापूर, 30 जून: भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasheb Thorat) यांच्या कन्या शरयू देशमुख (Sharayu Deshmukh) यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. 'मी एका शिक्षकाचा मुलगा आहे, त्यामुळे मला संस्कृतपणा शिकवू नका' असं पलटवार पडळकर यांनी केला.

सोलापूरमध्ये पत्रकारांशी बोलत असताना गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली. यावेळी शरयू देशमुख यांनी पात्रता काढल्यामुळे पडळकर चांगलेच संतापले होते.

दिलीप कुमार यांची तब्येत पुन्हा खालावली; ICU मध्ये केलं दाखल

'राज्यातील काही घराणे हे अतिसुसंस्कृत आहेत. मी एका शिक्षकाचा मुलगा आहे. तुमच्या विरोधात बोललो की लगेच असंस्कृतपणा दिसतो. त्यामुळे मला संस्कार शिकवण्याची गरज नाही', असं प्रत्युत्तर पडळकरांनी दिलं.

तसंच, यावेळी पडळकरांनी शरद पवार यांच्यावरही विखारी टीका केली.  'साडेतीन जिल्ह्याच्या बाहेर त्यांची पार्टी नाही. काही जणांना वाटते की, कोबडं आरवल्याशिवाय उजाडत नाही. असेच काही कोंबडे दिल्लीत एकत्र जमले होते. त्यामुळे याचं असं झालंय की, रात गेली हिशेबात पोरगं नाही नशिबात, त्यामुळे पुढं कुठल्यातरी लवणात ससा सापडेल अशी अपेक्षा आहे, अशी खोचक टीका पडळकर यांनी केली.

काय म्हणाल्या होत्या शरयू देशमुख?

'आमच्या हाती सत्ता द्या, चार महिन्यात ओबीसी आरक्षण (OBC Reservation) मिळवून देतो जर असं झालं नाहीतर राजकीय संन्यास घेईल, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेत बाळासाहेब थोरात यांनी फडणवीस यांनी वेगळा विदर्भ होईपर्यंत लग्न करणार नाही, केलेल्या विधानाची आठवण करून दिली. या वादात उडी घेत गोपीचंद पडळकर यांनी ट्वीट करत ‘महसूल मंत्रीपदाच्या रस्सीखेचामुळे काही लोक भ्रमिष्टाप्रमाणे गांजा पिल्यासारखे बरळू लागले आहेत. मुळात देवेंद्र फडणवीसांचे लग्न विदर्भयात्रेच्या पाच वर्षाअगोदरच झाले आहे, याचेही भान यांना राहिले नाही.’ अशी टीका केली होती.

राज्यातल्या कोरोना लसीच्या साठ्यासंदर्भात आरोग्यमंत्र्यांनी दिली मोठी माहिती

पडळकरांच्या या टीकेल्या थोरात यांची कन्या शरयू देशमुख यांनी ट्वीट करून जशास तसे उत्तर दिले. 'पात्रतेपेक्षा जास्त मिळाले की असं होतं. आपल्या भाषेवरून आपल्या संस्कारांची ओळख होती. असो, ज्याचे त्याचे संस्कार..!' असं म्हणत शरयू देशमुख यांनी पडळकरांना चांगलेच संस्काराचे धडे दिले.

First published:

Tags: Balasaheb thorat, Discipline, Maharashtra, Mumbai, Pune, Reservation, ओबीसी OBC