Home /News /maharashtra /

वाळू माफियांचा मुजोरपणा, रात्रीच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

वाळू माफियांचा मुजोरपणा, रात्रीच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

वाळू माफियांची दहशत अशीच राहिली तर पर्यावरणाला धोका निर्माण होईल त्याचबरोबर गुन्हेगारी प्रवृत्तीतही वाढ होईल अशीही भीती व्यक्त केली जातेय.

  दौंड 19 फेब्रुवारी : शिरापूर गावातील वाळू माफियांचा कहर झालाय. फायबर बोटीच्या सहाय्याने वाळू उपसा का करतो म्हणून एका तरुणचा या माफियांनी जीव घेतल्याचा संशय व्यक्त केला जातोय. मलठन गावच्या हद्दीत अवैध रित्या वाळू उपसा करत असल्याने त्याला मलठण गावा मधील वाळू उपसा करणाऱ्यां वाळू माफियांनी रात्रीच्या वेळेस मारहाण केल्याची घटना दौंड तालुक्यातील मलठण या गावच्या हद्दीत घडली आहे. या मारहाणीत निखिल होलम या 25 वर्षीय तरुणाचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. निखिल होलम या तरुणाचा भीमा नदीच्या पात्रात शोध सुरू आहे. पुणे जिल्हा जिल्हाधिकारी यांचे आपत्ती व्यवस्थापन पथक आणि दौंड पोलिसांन कडून हा शोध सुरू आहे. चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतरही अद्याप या पथकास तरुणाचा शोध घेण्यात यश आले नाही. एन डी आर एफ च्या पथकालाही मदतीसाठी या ठिकाणी पाचारण करण्यात येणार आहे. नदीकाठी गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत वाळू माफियांविरुद्ध करावाईची मागणी केलीय. त्यामुळे गावात तणाव निर्माण झालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीतून ट्वीट करत केलं शिवाजी महाराजांना अभिवादन अनेक जिल्ह्यांमध्ये वाळू माफियांचा हैदोस असून त्यांच्या कारनाम्यांमुळे प्रचंड दहशत निर्माण झालीय. या माफियांविरुद्ध कारवाई करण्यासाठी गेलेल्या सरकारी अधिकाऱ्यांवरही हे माफिया हल्ले करतात. त्याच्या अनेक घटना घडल्या असून पैशांच्या जोरावर आणि राजकीय लागेबांधे यामुळे त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही असा आरोप केला जातोय. यांची दहशत अशीच राहिली तर पर्यावरणाला धोका निर्माण होईल त्याचबरोबर गुन्हेगारी प्रवृत्तीतही वाढ होईल अशीही भीती व्यक्त केली जातेय. हेही वाचा...

  'एल्गार'वरून शिवसेना-राष्ट्रवादीत मतभेद आहेत का? अजित पवारांनी केला खुलासा

  छत्रपतींच्या संस्कारांची परळीत पायमल्ली, पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा

  Published by:Ajay Kautikwar
  First published:

  Tags: Sand mafiya

  पुढील बातम्या