पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीतून ट्वीट करत केलं शिवाजी महाराजांना अभिवादन

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीतून ट्वीट करत केलं शिवाजी महाराजांना अभिवादन

'महान प्रशासक, धैर्य आणि शौर्याचे प्रतिक असेल्या शिवाजी महाराजांचं जीवन सगळ्यांनाच प्रेरणादायी आहे.'

  • Share this:

नवी दिल्ली 19 फेब्रुवारी : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्व देशभर साजरी केली जातेय. एवढ नाही तर जगभर विखुरलेले सर्व मराठी माणसं ही महान राजे आणि हिंदवी स्वराज्याचे स्वस्थापक असलेल्या शिवाजी महाराजांची जयंती धुमधडाक्यात साजरी करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून ट्वीट करत महाराजांना अभिवादन केलंय. भारत मातेचे महान सुपूत्र, महान प्रशासक, धैर्य आणि शौर्याचे प्रतिक असेल्या शिवाजी महाराजांचं जीवन सगळ्यांनाच प्रेरणादायी आहे असं मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनातही आज धुमधडाक्यात शिवजयंती साजरी करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज यांची वैश्विक जयंती आज राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात साजरी झाली. या जयंती कार्यक्रमात बारा देशांचे राजदूत सहभागी झाले. या राजदूतांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल गौरव उद्गार काढले.

तर बल्गेरियाच्या राजदूत इलेन वोरा यांनी मराठीत भाषण करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. महाराष्ट्र सदनामध्ये यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. संपूर्ण महाराष्ट्र सदन हे हे फुलांनी सजविण्यात आले होते.

सोबतच नाशिकचे ढोल पथक आणि लेझीम पथकाने जयंती कार्यक्रमात रंगत आली. लष्काराच्या मराठा रेजिमेंटचा बँड महाराष्ट्र सदनात वाजवण्यात आला.शिवजन्माच्या सोहळ्यासाठी शिवाजी महाराजांचा पाळणा देखील सजविण्यात आला होता. छत्रपती संभाजी राजे यांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

First published: February 19, 2020, 3:30 PM IST

ताज्या बातम्या