छत्रपतींच्या संस्कारांची परळीत पायमल्ली, पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा

छत्रपतींच्या संस्कारांची परळीत पायमल्ली, पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा

शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात परळी येथे व्यापारी आणि सामान्य जनतेवर अन्याय जनतेने केलेलं बंद ही परिस्थिती तर छत्रपतींच्या संस्कारांची पायमल्ली आहे.

  • Share this:

मुंबई,19 फेब्रुवारी: भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी 'ट्विटर'च्या माध्यमातून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात परळी येथे व्यापारी आणि सामान्य जनतेवर अन्याय जनतेने केलेलं बंद ही परिस्थिती तर छत्रपतींच्या संस्कारांची पायमल्ली असल्याचे पंकजा मुंडे यांनी ट्वीट केलं आहे.

'परळीत गुंडागर्दी, हफ्तेखोरी, माफिया राज करायचं आणि पोलिसांनी कर्तव्य बजावल्यावर, गुन्हे दाखल झाल्यावर मग 'गय करणार नाही 'अशी भाषा करायची हे दुटप्पी धोरण असून गुंडांचं आत्मबल वाढवणारं पालकत्व आमच्या बीडला मिळालं हे दुर्दैव आहे. मात्र, हे खपवून घेतलं जाणार नाही,' अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी इशारा दिला आहे.

दरम्यान, परळीत सोमवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेली 'गुंडगिरी' कॅमेरात कैद झाली. गाड्यांची तोडफोड करुन एका व्यापाऱ्याला मारहाण करणारे हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असल्याचे समोर आले होते. परळीतील व्यापारी मारहाण प्रकरणी कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला होता. मात्र, बीडच्या पालकमंत्र्यांकडून छत्रपतींच्या संस्कारांची पायमल्ली केल्याची टीका पंकजा मुंडे यांनी केली आहे.

पंकजा मुंडे यांचे ट्वीट...

काय आहे प्रकरण?

परळीत टॉवर चौक परिसरात धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी सोमवारी दुपारी एका व्यापाऱ्याला बेदम मारहाण केली होती. एवढेच नाही तर मुंडे समर्थकांनी चौकात उभ्या असलेल्या काही गाड्यांचीही तोडफोड केली होती. राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी दहशत पसरवत सार्वजनिक मालमत्तेची नासधूसही केली होती. हा प्रकार या परिसरामध्ये बसवलेल्या वेगवगेळ्या सीटीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सीसीटीव्ही फुटेज परळी आणि बीड जिल्ह्यात व्हायरल झाले आहे.

दुसरीकडे, पुण्यातील व्यापारी अमर देशमुख यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला मारहाण केल्याचे सांगितले आहे. काठ्या आणि लोखंडी रॉडने अमर देशमुख यांच्यावर हल्ला केला करण्यात आला. सध्या देशमुख यांच्यावर परळीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.

काय म्हणाले होते धनंजय मुंडे?

हेही वाचा.. अजित दादा, आपण उगाच वेगळे राहिलो, आधीच एकत्र यायला हवं होतं - उद्धव ठाकरे

First published: February 19, 2020, 1:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading