मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पत्नीवर मटण कापण्याच्या सुऱ्याने केले सपासप वार, नंतर मारली तलावात उडी, पण...

पत्नीवर मटण कापण्याच्या सुऱ्याने केले सपासप वार, नंतर मारली तलावात उडी, पण...

 मागील काही दिवसांपासून आनंद हा आपल्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत असल्याने त्यांच्यात भांडण सुरू होते.

मागील काही दिवसांपासून आनंद हा आपल्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत असल्याने त्यांच्यात भांडण सुरू होते.

मागील काही दिवसांपासून आनंद हा आपल्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत असल्याने त्यांच्यात भांडण सुरू होते.

  • Published by:  sachin Salve

भिवंडी, 19 डिसेंबर : संशयाचं भूत मानगुटीवर बसलं तर माणूस काय करेल याचा नेम नाही. पत्नीच्या (wife) चारित्र्यावर संशय घेऊन एका पतीने मटण कापण्याच्या सुऱ्याने पत्नीची हत्या केल्याची घटना भिवंडीत घडली. धक्कादायक म्हणजे, पत्नीची हत्या (murder) केल्यानंतर या इसमाने तलावात उडी मारून आत्महत्येचा (husband attempted suicide) प्रयत्न केला. पण, वेळीच त्याला स्थानिकांनी वाचवले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद वाघमारे असं पत्नीची हत्या करून आत्महत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. भिवंडी शहरातील पद्मानगर परिसरातील मिलिंद नगर या भागात राहणारा आनंद वाघमारे याचे कामतघर परिसरात मटण विक्रीचे दुकान आहे. त्याची पत्नी मीना ही सुद्धा त्यास त्याच्या व्यवसायात मदत करीत असे.

यावर्षी हे 5 चित्रपट जे Sexist Dialogues मुळं राहिले चर्चेत, पाहा लिस्ट

दरम्यान मागील काही दिवसांपासून आनंद हा आपल्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत असल्याने त्यांच्यात भांडण सुरू होते. मागील तीन दिवसांपासून हा वाद वाढत गेला. रविवारी सायंकाळी दोघे घराकडे जात असतानाच वऱ्हाळ देवी मंदिर परिसरात त्यांच्यात वाद होऊन भांडण झाले.

यावेळी रागाच्या भरात आनंदने आपल्यासोबत असलेल्या पिशवीतील मटण कापण्याचा सुरा काढून पत्नी मीना हिच्या गळ्यावर पोटावर सपासप वार करून रक्तबंबाळ अवस्थेत तिला तिथेच टाकून नजीकच्या तलावात उडी मारली. तो गटांगळ्या खात असताना परिसरातील युवकांनी पाण्यात उड्या मारून त्याला पाण्याबाहेर काढले तोपर्यंत नागरिकांनी त्याच्या पत्नीस स्व.इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

यावर्षी या 8 अभिनेत्यांनी दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर गाजवलं अधिराज्य

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर आरोपी आनंदला पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान उपचार सुरू असताना पत्नी मीना हीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान शहर पोलीस ठाण्यात पत्नीच्या हत्येचा गुन्हा दाखल करीत पती आनंद यास ताब्यात घेत अटक केले आहे.

First published:

Tags: Bhiwandi