या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'धमाका' चित्रपटातील कार्तिक आर्यनची भूमिकेची फार चर्चा झाली होती. त्याचप्रमाणे विक्की कौशलने 'उधम' चित्रपटात आपल्या दमदार अभिनयाची चुणूक दाखवली. तारा सुतारियाने तडप या चित्रपटात आपल्या अभिनयाची कला दाखवली. विद्या बालन 'शेरनी' चित्रपटात अनोख्या अंदाजात दिसली होती. 'स्पेशल ऑप्स 1.5' मध्ये अभिनेते के मेनन आणि 'द फॅमिली मॅन 2' मध्ये अभिनेता मनोज बाजपेयी यांनी ही आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं.