बॉलीवूड चित्रपट केवळ भारतातच नाही तर जगभरात फार पसंत केले जातात. चित्रपटातील दृश्यं आणि संवादांमुळे लोक प्रभावित होतात. काही चाहते विचार न करता स्टार्सचे प्रसिद्ध डायलॉग फॉलो करतात. ते स्वत: ते बोलतात किंवा त्यावर कृती करतात. 'जब वी मेट' चित्रपटातील 'प्यार से दे रहे हैं रख लो, वरना थप्पड़ मारकर भी दे सकते हैं' आणि 'अकेली लड़की खुली तिजोरी की तरह होती है' असे अनेक संवाद द्वेषपूर्ण आहेत. मानसिकतेचे दर्शन घडवतात. यामुळे समाजात चुकीचा मेसेज जातो.
या चित्रपटात मीनाक्षीचे सासरे तिला तिच्या मित्राच्या चहाच्या बागेत काम करण्यास नकार देतात, कारण त्यांना त्यांच्यात संबंध असल्याचा संशय असतो. त्याचप्रमाणे मीनाक्षीच्या एका मैत्रिणीने तिला साडी भेट दिली तर तिच्या सासरच्या मंडळींना ते आवडत नाही.
जॉन अब्राहम स्टारर चित्रपटातील या अॅक्शन सीनमध्ये बांगड्या घालणं हे दुर्बलतेचे लक्षण असल्याचे दिसते. संवाद ऐकून असे दिसते की लेखक महिलांना सन्मान देणे जास्त महत्त्वाचे मानत नाहीत.
या चित्रपटात जेव्हा विक्रांत मॅसी तापसीच्या घरी तिला पाहण्यासाठी जातो तेव्हा मुलीची आई तिची मुलगी कशी सद्गुणी आहे आणि मुलाने तिच्या मुलीशी लग्न का करावे हे सांगते. दैनंदिन कामं कशी करायची हे माहीत असेल आणि 'सर्वगुण सम्पन्न' असेल तरच मुलींचं लग्न होऊ शकतं हे उघड आहे.
यामध्ये मृत मुलगा आस्तिकची विम्याची कागदपत्रे पाहून कुटुंबाला धक्का बसला आहे, कारण त्याची पत्नी संध्या विम्याच्या रकमेची पात्र आहे. कोणाला पेन सापडत नाही किंवा आपली विधवा सून संध्या हिला पेन न देण्याचे नाटक करत असल्याचे दृश्यात दाखवण्यात आले आहे. याचे कारण असे की जेव्हा घरातील पैशाचा प्रश्न येतो तेव्हा लोक महिलांवर विश्वास ठेवत नाहीत.
या विनोदी चित्रपटात असे अनेक संवाद आहेत, ज्यामध्ये महिलांना कमी लेखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. महिला ही मालमत्ता आहे असं दाखवण्यात आलं आहे. कॉमेडीच्या नावाखाली असे डायलॉग सर्रास रूढ झाले आहेत. चित्रपटाचे असे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप वेगाने प्रसारित होतात आणि लोक ही ते सहजपणे घेतात.